जेफ बेझोस श्रीमंतांच्या यादीत अव्वल

मस्क यांना मागे टाकले : संपत्तीमध्ये जवळपास 200 अब्ज डॉलर्सपर्यंत मजल : मुकेश  अंबानी यांची 11 व्या स्थानी झेप वृत्तसंस्था/ नवी दिल्ली आताच्या नव्या अहवालानुसार एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती राहिलेले नाहीत. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीनुसार, अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी त्यांना मागे टाकले आहे आणि ते पहिल्या स्थानावर पोहोचले आहेत. टेस्ला समभागांच्या घसरणीमुळे […]

जेफ बेझोस श्रीमंतांच्या यादीत अव्वल

मस्क यांना मागे टाकले : संपत्तीमध्ये जवळपास 200 अब्ज डॉलर्सपर्यंत मजल : मुकेश  अंबानी यांची 11 व्या स्थानी झेप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आताच्या नव्या अहवालानुसार एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती राहिलेले नाहीत. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीनुसार, अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी त्यांना मागे टाकले आहे आणि ते पहिल्या स्थानावर पोहोचले आहेत. टेस्ला समभागांच्या घसरणीमुळे मस्क यांच्या एकूण संपत्तीत घसरण अनुभवायला मिळाली आहे.
ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीनुसार, जेफ बेझोसची संपत्ती आता  200 अब्ज डॉलरची (सुमारे 16.58 लाख कोटी रुपये) आहे, तर एलॉन मस्कची एकूण संपत्ती 198 अब्ज डॉलरची (सुमारे 16.41 लाख कोटी रुपये) आहे. लुई व्हिटॉन मोएट हेनेसीचे सीईओ बर्नार्ड अर्नाल्ट 197 अब्ज डॉलरची (16.33 लाख कोटी) संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत.
या यादीतील पहिल्या दहामध्ये भारतातील एकाही अब्जाधीशाचा समावेश नाही. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी 115 अब्ज डॉलर्सच्या (सुमारे 9.53 लाख कोटी रुपये) संपत्तीसह 11 व्या स्थानावर आहेत. तर गौतम अदानी या यादीत 12 व्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 104 अब्ज डॉलरची (8.62 लाख कोटी रुपये) आहे.
टेस्लाचे समभाग 24 टक्केपेक्षा जास्त घसरले 
प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्कची कंपनी टेस्लाच्या स्टॉकमध्ये या वर्षी आतापर्यंत 24 टक्केपेक्षा जास्त घसरण झाली आहे. 1 जानेवारी रोजी ते 248.42 डॉलरवर होते, जे आता 188.14 (मार्च 5) पर्यंत खाली आले आहेत. शेअर्सच्या किमती घसरल्याने मस्कच्या संपत्तीत घसरण दिसली आहे. त्याचवेळी, अॅमेझॉनच्या शेअर्समध्ये यावर्षी आतापर्यंत 18 टक्के वाढ झाली आहे.