मजुरांना घेऊन जाणारी जीप ट्रकला धडकली, 9 जणांचा मृत्यू

सिरोही जिल्ह्यात रविवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 जण जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार मजुरांना घेऊन जाणारी जीप चुकीच्या बाजूने गेली आणि समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. हे सर्व लोक पाली जिल्ह्यात मजूर म्हणून कामाला जात होते. याच दरम्यान हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितनुसार ट्रक आणि जीपची जोरदार धडक झाली. या अपघातात आतापर्यंत 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर 15 जण जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उदयपूरच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. इतर जखमींवर सिरोही रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. या घटनेत एक मृत शिवगंज येथील तर एक मृत सुमेरपूर येथील आहे. तसेच बाकी सर्व उदयपूर जिल्ह्यातील ओगाना पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आहेत.

जीपमध्ये प्रवास करणारे मजूर पाली जिल्ह्यात कामावर जात असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. जीप चुकीच्या बाजूने आली आणि समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. या अपघातात जीप चालक आणि कंत्राटदाराचाही मृत्यू झाला आहे.

Go to Source