मी कुठेही जाणार नाही…माझ्या नावाची चर्चा असेल तर चांगलचं आहे; भाजपा प्रवेशावरून जयंत पाटलांनी केला खुलासा
काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या पक्ष प्रवेशानंतर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या आज सकाळपासून होत्या. या चर्चांना पुर्ण विराम देण्यासाठी जयंत पाटील यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन या अफवांचे खंडन केले. मी कुठेही जाणार नसून माझ्या नावाच्या चर्चा होत असतील तर चांगलच असल्याचही त्यांनी म्हटलं आहे.
गेल्या काही दिवसापासून पश्चिम महाराष्ट्रातील अनेक बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत असतानाच आज दिवसभर शरद पवार गटाचे जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची एकच चर्चा सुरु झाली. त्यामुळे आज जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याचं खंडन केलं.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे यांना या पक्षप्रवेशाबद्दल विचारले असता त्यांनी आपली आणि जयंत पाटील यांची कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याचं सांगितलं. जरी या बातम्या कल्पोकल्पीत असल्या तरी येत्या काही दिवसांमध्ये राजकारणामध्ये काहीही घडू शकतं असा दावाही त्यांनी केला आहे.
यावर आपल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना जयंत पाटील म्हणाले, “कोण काही कुठेही येणार नाही आणि जाणारही नाही. माझ्या नावाची चर्चा माध्यमांमध्ये असेल तर चांगलंच आहे. प्रसिद्धी मिळाली की लोकांसमोरही जाता येतं. पण या ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्यावर आपण यावर नंतर बोलू.” असेही ते म्हणाले.
Home महत्वाची बातमी मी कुठेही जाणार नाही…माझ्या नावाची चर्चा असेल तर चांगलचं आहे; भाजपा प्रवेशावरून जयंत पाटलांनी केला खुलासा
मी कुठेही जाणार नाही…माझ्या नावाची चर्चा असेल तर चांगलचं आहे; भाजपा प्रवेशावरून जयंत पाटलांनी केला खुलासा
काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या पक्ष प्रवेशानंतर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या आज सकाळपासून होत्या. या चर्चांना पुर्ण विराम देण्यासाठी जयंत पाटील यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन या अफवांचे खंडन केले. मी कुठेही जाणार नसून माझ्या नावाच्या चर्चा होत असतील तर चांगलच असल्याचही त्यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसापासून […]