तिकोटा येथील जवान राजू करजगी हुतात्मा
विजापूर : विजापूर जिल्ह्यातील तिकोटा शहरातील जवानाला जम्मू आणि काश्मीरमध्ये सेवेत असताना वीरमरण आले आहे. सोमवारी याची माहिती मिळाली. राजू गिरमल्ला करजगी असे वीरमरण आलेल्या जवानाचे नाव आहे. त्यांचे पार्थिव बुधवारी सकाळी तिकोटा शहरात दाखल होणार आहे. जवान राजू यांचे पार्थिव हैदराबादमार्गे विजापूर जिल्ह्यातील तिकोटा शहरात आणले जाणार आहे. राजू हे सुरुवातीला मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील महार रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. सध्या ते प्रतिनियुक्तीवर जम्मू-काश्मीरच्या 51 राष्ट्रीय रायफल्स बटालियनमध्ये कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. राजू करजगी हे 16 वर्षे भारतीय लष्करात कार्यरत होते. त्यांचा 10 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. जवान राजू यांच्या निधनामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.
Home महत्वाची बातमी तिकोटा येथील जवान राजू करजगी हुतात्मा
तिकोटा येथील जवान राजू करजगी हुतात्मा
विजापूर : विजापूर जिल्ह्यातील तिकोटा शहरातील जवानाला जम्मू आणि काश्मीरमध्ये सेवेत असताना वीरमरण आले आहे. सोमवारी याची माहिती मिळाली. राजू गिरमल्ला करजगी असे वीरमरण आलेल्या जवानाचे नाव आहे. त्यांचे पार्थिव बुधवारी सकाळी तिकोटा शहरात दाखल होणार आहे. जवान राजू यांचे पार्थिव हैदराबादमार्गे विजापूर जिल्ह्यातील तिकोटा शहरात आणले जाणार आहे. राजू हे सुरुवातीला मध्य प्रदेशातील सागर […]