जातक कथा: लखन मृगाची गोष्ट

Kids story : अनेक वर्षांपूर्वी मगध जनपद नावाचे एक नगर होते. त्याच्याजवळ एक घनदाट जंगल होते. जिथे हरणांचा एक कळप राहायचा. हरीण राजाला दोन मुले होती. त्यामधील एकाचे नाव लखन दुसऱ्याचे नाव काला होते. जेव्हा राजा वृद्ध झाला तेव्हा त्याने आपल्या दोन्ही …

जातक कथा: लखन मृगाची गोष्ट

Kids story : अनेक वर्षांपूर्वी मगध जनपद नावाचे एक नगर होते. त्याच्याजवळ एक घनदाट जंगल होते. जिथे हरणांचा एक कळप राहायचा. हरीण राजाला दोन मुले होती. त्यामधील एकाचे नाव लखन दुसऱ्याचे नाव काला होते. जेव्हा राजा वृद्ध झाला तेव्हा त्याने आपल्या दोन्ही मुलांना उत्तराधिकारी घोषित केले.  दोघांच्या भागामध्ये 500-500 हरीण आले.

 

लखन आणि काला उत्तराधिकारी बनल्यानंतर काही दिवसांनी मगधच्या लोकांवर शेतात पीक कापण्याची वेळ आली. व त्यामुळे वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेताजवळ विविध प्रकारची उपकरणे लावली. हरणाच्या राजाला याची माहिती मिळताच त्याने आपल्या दोन्ही मुलांना आपापल्या गटासह सुरक्षित डोंगराळ भागात जाण्यास सांगितले. वडिलांनी सांगितले म्हणून लागलीच काला आपल्या कळपाला घेऊन पर्वताकडे निघून गेला. त्याने थोडा देखील विचार केला नाही की दिवस लोक त्यांची शिकार करतील. व झाले तसेच. वाटेमध्ये अनेक हरीण शिकारींचे शिकार बनले. तर लखन बुद्धिमान मृग होता. त्यामुळे त्याने आपल्या हरणांस रात्रीच्या अंधारात पर्वताकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि सर्वजण सुखरूपपणे पर्वतावर पोहोचले. काही महिन्यांनी पीक कापणी झाल्यावर लखन आणि काला पुन्हा जंगलात परतले. ते दोघेही गटासोबत परतले तेव्हा त्यांच्या वडिलांनी पाहिले की, लखनच्या कळपातील सर्व मृग एकत्र आहे आणि कालाच्या कळपातील हरणांची संख्या कमी आहे. यानंतर सर्वांना लखनच्या बुद्धिमत्तेबद्दल आश्चर्य वाटले व सर्वांनी लखनचे कौतुक केले.

तात्पर्य : कोणतेही काम करण्यापूर्वी अनेक वेळा विचार करावा यामुळे नेहमी यश मिळते.

Edited By- Dhanashri Naik