जातक कथा: चंद्रावरील ससा
Kids story : अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका घनदाट जंगलामध्ये एका नदीच्या किनारी ससा, कोल्हा, माकड आणि पाणमांजर राहायचे. या सर्व मित्रांची एकच इच्छा होती की सर्वात मोठा दानशूर बनण्याची. एके दिवशी चौघांनी मिळून ठरवले की आपण काहीतरी दान करू या. चारही मित्रांनी आपापले घर सोडले.
पाणमांजर नदीच्या किनाऱ्यावरून सात मासे घेऊन आला. कोल्हा दही भरलेली हंडी आणि मांसाचे तुकडे घेऊन आला. त्यानंतर माकड झाडावरून आंबे घेऊन आले. दिवस संपायला आला होता पण सश्याला काय आणावे हे समजत न्हवते. ससा रिकाम्या हाताने आला. रिकाम्या हाताने परतलेला ससा पाहून तिघा मित्रांनी त्याला विचारले तू काय दान करशील? आज दान केल्याने महान दानाचा लाभ मिळेल माहित नाही का? या वर ससा म्हणाला हो मला माहीत आहे म्हणून आज मी स्वतः दान करण्याचा निर्णय घेतला आहे. हे ऐकून सशाच्या सर्व मित्रांना आश्चर्य वाटले. ही बातमी भगवान इंद्राला मिळताच ते थेट पृथ्वीवर आले.
पृथ्वीवर ऋषीच्या वेषात आलेले इंद्र चार मित्रांजवळ गेले व प्रथम कोल्हा, माकड आणि पाणमांजर यांनी दान केले. त्यानंतर भगवान इंद्र सशाजवळ आले व म्हणाले तू काय दान देणार? सशाने सांगितले की तो स्वतःचे दान करत आहे. हे ऐकून इंद्रदेवांनी आपल्या सामर्थ्याने तिथे आग लावली आणि सशाला आत बसण्यास सांगितले. ससा आगीमध्ये बसला. हे पाहून इंद्राला आश्चर्य वाटले. त्याला असे वाटले की ससा खरोखर एक महान दाता आहे आणि हे पाहून भगवान इंद्र खूप आनंदित झाले. दुसरीकडे आगीतही ससा सुरक्षित उभा होता. तेव्हा इंद्रदेव म्हणाले की, मी तुझी परीक्षा घेत होतो. ही आग खोटी आहे, त्यामुळे ती तुम्हाला इजा करणार नाही असे सांगितल्यावर इंद्रदेव सशाला आशीर्वाद देत म्हणाले की, तुझे हे दान सर्व जग सदैव लक्षात ठेवेल. मी चंद्रावर तुझ्या शरीराची खूण करीन व भगवान इंद्राने एका पर्वताचा चुरा करून चंद्रावर सशाची खूण केली. तेव्हापासून असे मानले जाते की चंद्रावर सशाचे ठसे आहे आणि अशा प्रकारे चंद्रावर न पोहोचताही सशाचे ठसे चंद्रावर पोहोचले.
तात्पर्य- कोणतेही काम करण्यासाठी प्रबळ आत्मविश्वास असणे आवश्यक आहे.
Edited By- Dhanashri Naik