जस्मिन, अरुंधती उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था/ ग्रेटर नोयडा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेती जस्मिन तसेच माजी युवा विश्वविजेती अरुंधती चौधरी यांनी महिलांच्या राष्ट्रीय मुष्ठीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत रविवारी आपल्या वजन गटातून उपांत्यपूर्व फेरी गाठताना प्रतिस्पर्ध्यावर एकतर्फी मात केली. 60 किलो वजन गटात सेनादलाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जस्मिनने मणिपूरच्या थोंगम पुंजाराणी देवीचा 5-0 अशा गुणफरकाने एकतर्फी पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. […]

जस्मिन, अरुंधती उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था/ ग्रेटर नोयडा
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेती जस्मिन तसेच माजी युवा विश्वविजेती अरुंधती चौधरी यांनी महिलांच्या राष्ट्रीय मुष्ठीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत रविवारी आपल्या वजन गटातून उपांत्यपूर्व फेरी गाठताना प्रतिस्पर्ध्यावर एकतर्फी मात केली.
60 किलो वजन गटात सेनादलाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जस्मिनने मणिपूरच्या थोंगम पुंजाराणी देवीचा 5-0 अशा गुणफरकाने एकतर्फी पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. जस्मिनची उपांत्यपूर्व फेरीची लढत महाराष्ट्राच्या पुनम कैथवासशी होणार आहे. महिलांच्या 66 किलो वजन गटातील रविवारी खेळविण्यात आलेल्या लढतीमध्ये अरुंधती चौधरीने पोलीस दलाच्या अमितावर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवित उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. अरुंधतीचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना पंजाबच्या कोमलप्रित कौरशी होणार आहे. सेनादलाचे प्रतिनिधित्व करणारी साक्षी 57 किलो गटात दिल्लीच्या ज्योतीशी लढत देईल. तसेच हरियाणाची स्वाती बोराची 81 किलो वजन गटातील लढत उत्तर प्रेदशच्या कनिश्का बरोबर होणार आहे. स्वाती बोराची उपांत्यपूर्व फेरीची लढत महाराष्ट्रच्या सई देवकरशी होणार आहे.