दाक्षिणात्य सुपरस्टार्ससोबत जान्हवी करणार काम

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत जान्हवीला मोठी मागणी धडक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी जान्हवी कपूरने आतापर्यंत विविध चित्रपटांमध्ये काम करत स्वत:च्या अभिनयक्षमतेला प्रयोगशीलतेची जोड दिली आहे. जान्हवी आता बॉलिवूडसोबत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही स्वत:चे स्थान निर्माण करू पाहत आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआरसोबत लवकरच ती देवरा या चित्रपटात दिसून येणार आहे. याचबरोबर जान्हवी आणखी दोन मोठ्या दाक्षिणात्य स्टार्ससोबत झळकणार […]

दाक्षिणात्य सुपरस्टार्ससोबत जान्हवी करणार काम

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत जान्हवीला मोठी मागणी
धडक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी जान्हवी कपूरने आतापर्यंत विविध चित्रपटांमध्ये काम करत स्वत:च्या अभिनयक्षमतेला प्रयोगशीलतेची जोड दिली आहे. जान्हवी आता बॉलिवूडसोबत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही स्वत:चे स्थान निर्माण करू पाहत आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआरसोबत लवकरच ती देवरा या चित्रपटात दिसून येणार आहे.
याचबरोबर जान्हवी आणखी दोन मोठ्या दाक्षिणात्य स्टार्ससोबत झळकणार आहे. 2024 ती अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम करणार आहे. जान्हवी आता दाक्षिणात्य दिग्दर्शकांची देखील पसंत ठरत आहे. जान्हवी पुढील काळात राम चरण आणि सूर्यासोबत मोठ्या पडद्यावर दिसून येणार आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्यासोबत तिला एका मोठ्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. जान्हवी ही राकेश ओम प्रकाश मेहरा यांचा पौराणिक चित्रपट ‘महाभारत’मध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. सूर्या या चित्रपटात ‘कर्ण’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. तर जान्हवी कपूर यात ‘द्रौपदी’च्या भूमिकेत दिसून येणार आहे. चित्रपटासाठी जान्हवीने अनेक लुक टेस्ट दिल्या आहेत.