जंगी कुस्ती मैदान रविवारी

बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगावतर्फे रविवार दि. 3 मार्च रोजी हिंदवाडी येथील आनंदवाडी कुस्ती आखाड्यात कै. रामचंद्र मल्लाप्पा टक्केकर व कै. शांता रामचंद्र टक्केकर यांच्या स्मरणार्थ श्रीराम बिल्डर्स डेव्हलपर्स आणि इंजिनिअरचे संचालक समाजसेवक गोविंद रामचंद्र टक्केकर यांच्या सहकार्याने भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महाराष्ट्र व […]

जंगी कुस्ती मैदान रविवारी

बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगावतर्फे रविवार दि. 3 मार्च रोजी हिंदवाडी येथील आनंदवाडी कुस्ती आखाड्यात कै. रामचंद्र मल्लाप्पा टक्केकर व कै. शांता रामचंद्र टक्केकर यांच्या स्मरणार्थ श्रीराम बिल्डर्स डेव्हलपर्स आणि इंजिनिअरचे संचालक समाजसेवक गोविंद रामचंद्र टक्केकर यांच्या सहकार्याने भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महाराष्ट्र व कर्नाटक चॅम्पियन मल्ल यांच्यात निकाली मैदान आयोजित करण्यात आले आहे. तसेच नवोदित महिला कुस्तीपटू तसेच बेळगाव तालुका व जिल्ह्यातील कुस्तीपटूना प्रोत्साहन देण्यासाठी 70 हून अधिक कुस्त्या नेमण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकाची कुस्ती आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू विनायक दळवींचा पट्टा आणि सेनादलचा संग्राम पाटील विरूद्ध राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता उदय कुमार दिल्ली यांच्यात होणार आहे.  दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती बस्सु गोडगेरींचा पट्टा राष्ट्रीय पदक विजेता प्रकाश इंगळगी विरूद्ध महाराष्ट्र चॅम्पियन कोल्हापूर केशव भगत तर तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती सेनादल राष्ट्रीय पदक विजेता, जागतिक सुवर्ण पदक विजेता विनायक दळवी यांचा पट्टा सोनबा गोंगाणे विरूद्ध राष्ट्रीय पदक विजेता साई हॉस्टेल धारवाड राम बुडकींचा पट्टा परमानंद इंगळगी यांच्यात.
आकर्षक कुस्ती सरपंच केसरी लहान कंग्राळी रोहीत पाटील विरूद्ध कर्नाटक चॅम्पियन मुतुराज धारवाड, युनिव्हर्सिटी ब्ल्यू रूपेश कर्ले, राष्ट्रीय विजेता पांडुरंग, सलिल पठाण रणकुंडये विरूद्ध साई हॉस्टेल राष्ट्रीय रौप्यपदक विजेता ओम घाडी, प्रज्वल मच्छे विरूद्ध वेदांत मासेकर भांदूर गल्ली यांच्यात होणार आहे. तर महिला गटात बेळगाव बाल केसरी विजेता प्रांजल बिर्जे विरूद्ध समिक्षा उशिणकर खानापुर, ऋतुजा रावळ शहापुर विरूद्ध पूर्वा आंबेवाडी, कल्याणी अंबोळकर वाघवडे विरूद्ध समिक्षा धामणेकर येळ्ळूर, दर्शनी कोटबागी विरूद्ध सिद्धी निलजकर ल. कंग्राळी, संध्या गोडगेरी विरूद्ध आदीती कोरे शहापूर, श्रेया गोडगेरी विरूद्ध भक्ती गावडा मोदेकोप खानापुर, प्रभा शिवणगेकर खादरवाडी विरूद्ध दिया मोहीते अनगोळ, श्रावणी तरळे आंबेवाडी विरूद्ध तनुजा खानापुर, ऐश्वर्या चिक्कोडी विरूद्ध जान्हवी पाटील किणये, मेरी गोडगेरी विरूद्ध मनस्वी जायाण्णाचे, लक्ष्मी गोडगेरी विरूद्ध शितल सुतार खादरवाडी, समिधा बिर्जे विरूद्ध वडगाव पूर्वी लोकळूचे धामणे, आराध्य हलगेकर येळ्ळूर विरूद्ध सीया चव्हाण वडगाव, मिथिला बिर्जे विरूद्ध स्वराणी गोरल खादरवाडी, प्रार्थना वकुंद बेळगाव विरूद्ध सानवी गवळी टिळकवाडी यांच्यात. इतर 60 हून अधिक बेळगाव तालुका व जिल्ह्यातील आकर्षक लहान-मोठ्या कुस्त्या आयोजित केल्या आहेत. तरी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगावतर्फे करण्यात आले आहे.