जळगाव : ६५ प्रवाशांसह सूतगिरणीत घुसली एसटी बस

जळगावातील चोपडा गावाजवळ एक बस खराब रस्त्यामुळे थेट सूतगिरणीत घुसल्याने अपघात झाला. रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. यावेळी …

जळगाव : ६५ प्रवाशांसह सूतगिरणीत घुसली एसटी बस

जळगावातील चोपडा गावाजवळ एक बस खराब रस्त्यामुळे थेट सूतगिरणीत घुसल्याने अपघात झाला. रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. यावेळी बसमध्ये ६० ते ६५ प्रवासी होते, मात्र ते बालंबाल बचावले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती समोर आली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा आगाराची बस ही चोपडा येथून नाशिकच्या दिशेने निघाली होती. मात्र थोडे दूर गेल्यावर रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्याचा चालकाला अंदाज न आल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यातच बाजूला असलेल्या खडीच्या ढिगा-यामुळे चालक ते वाहन काही थांबवू शकला नाही.

 

परिणामी भरधाव वेगाने धावत असलेली बस ही सरळ चोपडा सूतगिरणीच्या गेटमधून आत शिरली. यावेळी बसमध्ये ६० ते ६५ प्रवासी होते, पण ते सुदैवाने वाचले. एकही प्रवासी जखमी झाला नसल्याने सुदैवाने मोठी हानी टळली . अवघ्या काही सेकंदांचा हा थरार सूतगिरणीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मात्र या अपघातामुळे एकच खळबळ माजली आहे. तसेच या दुर्घटनेतून धडा घेऊन आता सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन मोठेमोठे खड्डे तरी बुजवावेत, अशी मागणी सर्वत्र केली जात आहे.

 

Edited by -Ratnadeep Ranshoor

Go to Source