धनवीरसिंग ठाकूर, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातील अनेक तर्क वितर्क लढविण्यात येत होते. परंतु आज , अर्ज माघारी घेण्याची मुदत संपली असता अनेक नवीन भूमिका आणि उपस्थित प्रश्नांच्या गर्दी मध्ये, तर्क वितर्काच्या लोंढ्या ला पुरेसा विराम लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
जळगाव शहर मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आपली उमेदवारी कायम ठेवत असतांना अपक्ष उमेदवारी अर्ज भरून आपण आपल्या मतदार संघातील मागील १० वर्षां पासून प्रलम्बित असलेल्या अनेक मुद्द्यांना मार्गी लावू असा निर्धार करीत अश्विन सोनवणे ह्यांनी जळगाव शहर भरातील राजकीय चर्चाना उधाण आणलेलं आहे.
जळगाव शहर मतदार संघातील सध्या स्थितीत उमेदवारी करीत असलेले भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार सुरेश भोळे ( राजू मामा ) ह्यांची नक्कीच डोके दुखी वाढणार असल्याचं भासतेय. मतदानाच्या घटका जवळच असून येणाऱ्या २० तारखे पर्यन्त अनेक घडामोडी घडून येण्याची चिन्हे आज उमेदवारी अर्ज मागे घेणाच्या शेवटच्या दिवसाच्या अंती स्पष्ट होतांना दिसत आहेत.