दिवाळी फराळ : गुळाचे शंकरपाळे

साहित्य- 2 वाटी गव्हाच पीठ अर्धा वाटी डाळीच पीठ सवा वाटी किसलेला गूळ अर्धी वाटी तुपाच मोहन चिमूटभर मीठ तळायला तूप

दिवाळी फराळ : गुळाचे शंकरपाळे

साहित्य-  

2 वाटी गव्हाच पीठ 

अर्धा वाटी डाळीच पीठ

सवा वाटी किसलेला गूळ

अर्धी वाटी तुपाच मोहन

चिमूटभर मीठ 

तळायला तूप 

 

कृती –

गुळाचे शंकरपाळे बनवण्यासाठी सर्वात आधी अर्धी वाटी पाण्यामध्ये गूळ, तूप व मीठ घालून उकळून घ्यावे. तसेच थंड झाल्यानंतर त्यामध्ये गव्हाच पीठ आणि डाळीच पीठ घालून पीठ घट्ट भिजवून घ्यावे. आता साधारण तासभर पीठ भिजल्यानंतर मोठे गोळे करुन पोळी लाटून घ्यावी व शंकरपाळे कापून घ्यावे. कढईमध्ये तूप गरम करुन शंकरपाळे तांबूस रंग येई पर्यंत तळून घ्यावे. तर चला तयार आहे आपले दिवाळी फराळ विशेष गुळाचे शंकरपाळे रेसिपी. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

 

Edited By- Dhanashri Naik