गूळ – नाराळाचे मोदक

साहित्य- 1 कप खोबरं कीस 1/2 कप खोवा 1/2 कप किसलेला गूळ 1 चमचे वेलची पूड 1 कप मैदा 1/2 कप रवा 2-3 चमचे तुप

गूळ – नाराळाचे मोदक

साहित्य-

1 कप खोबरं कीस

1/2 कप खोवा

1/2 कप किसलेला गूळ

1 चमचे वेलची पूड

1 कप मैदा

1/2 कप रवा

2-3 चमचे तुप

 

कृती-

खोवा हलका परतून घ्यावा.

नंतर एका पातेल्यात खोवा, खोबरं कीस, गूळ, वेलची पूड घालून मिसळून घ्यावं. 

आता एका बाउल मध्ये मैदा, रवा, तुप, घालून मिसळून जरा-जरा पाणी घालत पीठ मळून थोडावेळ झाकून ठेवावं.

नाराळाच्या मिश्रणाचे लहान-लहान गोळे करुन घ्यावे.

नंतर पाती लाटून सारण भरून मोदक वळून घ्यावे.

एका कढईत तेल गरम करून नारळाचे मोदक मंद आचेवर तळून घ्यावे.