जगदीश शेट्टर यांचा ग्रामीणमध्ये जोरदार प्रचार

भाजपच्या पाठीशी राहण्याची मतदारांना विनवणी बेळगाव : बेळगाव लोकसभेचे भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी बुधवारी बेळगाव ग्रामीण मतदारसंघात जोरदार प्रचार केला. बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात अनेक उपक्रम राबवून भविष्यात विकास करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांची गरज असून प्रत्येक मतदाराने समजूतदारपणे विचार करून भाजपच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन जगदीश शेट्टर […]

जगदीश शेट्टर यांचा ग्रामीणमध्ये जोरदार प्रचार

भाजपच्या पाठीशी राहण्याची मतदारांना विनवणी
बेळगाव : बेळगाव लोकसभेचे भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी बुधवारी बेळगाव ग्रामीण मतदारसंघात जोरदार प्रचार केला. बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात अनेक उपक्रम राबवून भविष्यात विकास करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांची गरज असून प्रत्येक मतदाराने समजूतदारपणे विचार करून भाजपच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन जगदीश शेट्टर यांनी केले. बुधवारी सकाळी बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील आझमनगर येथे वकिलांशी चर्चा केली. आपल्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी वकिलांना केले. यावेळी राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके, नगरसेवक श्रेयस नाकाडी, देवराज बसनवाडी, एम. बी. जिरली, सुनील पाटील, मुरगेंद्रगौडा पाटील, प्रभू यत्नट्टी, मोहन माविनकट्टी यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील देसूर, नागेनहाळ, संतिबस्तवाड, किणये, बेळगुंदी, कुद्रेमनी, उचगाव, हिंडलगा, कंग्राळी के. एच. या गावांमध्ये शेट्टर यांनी भेटी देऊन कार्यकर्त्यांच्या बैठकी घेतल्या. गावोगावी शेट्टर यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी माजी आमदार मनोहर कडोलकर, महांतेश कवटगीमठ, धनंजय जाधव, संजय पाटील यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.