जगदीश शेट्टर यांचा बैलहोंगल तालुक्यात जोरदार प्रचार

बेळगाव : भाजपचे बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी सोमवारी सायंकाळी बैलहोंगल तालुक्यात जोरदार प्रचार केला. पट्टीहाळ गावामध्ये कार्यकर्त्यांची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांची माहिती करून दिली. देशात सक्षम सरकार हवे असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर किंगनूर, अरवळ्ळी, जालिकोप्प, लिंगदाळे यासह परिसरात दौरा राबविण्यात आला. विधान परिषद माजी […]

जगदीश शेट्टर यांचा बैलहोंगल तालुक्यात जोरदार प्रचार

बेळगाव : भाजपचे बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी सोमवारी सायंकाळी बैलहोंगल तालुक्यात जोरदार प्रचार केला. पट्टीहाळ गावामध्ये कार्यकर्त्यांची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांची माहिती करून दिली. देशात सक्षम सरकार हवे असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर किंगनूर, अरवळ्ळी, जालिकोप्प, लिंगदाळे यासह परिसरात दौरा राबविण्यात आला. विधान परिषद माजी सदस्य महांतेश कवटगीमठ, माजी आमदार जगदीश मेटगुड, डॉ. व्ही. ई. पाटील, जेडीएसचे शंकर मुडलगी यासह इतर उपस्थित होते. जगदीश शेट्टर यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार बैलहोंगल तालुक्यातील कार्यकर्त्यांनी केला. रविवारी सायंकाळी रामनाथ मंगल कार्यालय येथे झालेल्या सभेवेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राज्यातील काँग्रेस सरकारवर हल्ला चढविला. नागरिकांना गॅरंटी योजनांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरगामी परिणाम करणाऱ्या योजनांवर अधिक विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. जगदीश शेट्टर यांची बेळगावशी पूर्वीपासून नाळ आहे. त्यामुळे येथील मतदार त्यांना 2 लाख मताधिक्क्याच्या फरकाने विजयी करतील, यात शंका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.