तालुक्याच्या पश्चिम भागात शिवशंभोचा जागर

महाशिवरात्रीनिमित्त विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम-हर हर महादेवचा जयजयकार, आज महाप्रसाद वार्ताहर/उचगाव बेळगावच्या पश्चिम भागातील अनेक गावांतून महाशिवरात्रीनिमित्त  प्रवचन, कीर्तन, अभिषेक, महापूजा, महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक गावातील मंदिरांतून शनिवार दि. 9 मार्च रोजी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे. रामलिंग देवस्थान उचगाव  उचगाव-गोजगे मार्गावरील उचगावनजीक असलेल्या रामलिंग मंदिरामध्ये महाशिवरात्रीचे औचित्य साधून विविध […]

तालुक्याच्या पश्चिम भागात शिवशंभोचा जागर

महाशिवरात्रीनिमित्त विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम-हर हर महादेवचा जयजयकार, आज महाप्रसाद
वार्ताहर/उचगाव
बेळगावच्या पश्चिम भागातील अनेक गावांतून महाशिवरात्रीनिमित्त  प्रवचन, कीर्तन, अभिषेक, महापूजा, महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक गावातील मंदिरांतून शनिवार दि. 9 मार्च रोजी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.
रामलिंग देवस्थान उचगाव 
उचगाव-गोजगे मार्गावरील उचगावनजीक असलेल्या रामलिंग मंदिरामध्ये महाशिवरात्रीचे औचित्य साधून विविध पूजा, अर्चा आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी पहाटे मंदिरामध्ये किरणोत्सव प्रसंगी शिवमूर्तीवर अभिषेक, पूजा, महाआरती आणि तीर्थप्रसाद रामलिंग सेवा अभिवृद्धी संघामार्फत करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांच्या हस्ते पूजनाचा कार्यक्रम पार पाडला. शनिवार दि. 9 मार्च रोजी पहाटे महाआरती, पूजा तीर्थप्रसाद होईल. आणि सकाळी 8 ते 12 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या महाप्रसादाचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा, असे रामलिंग सेवा अभिवृद्धी संघामार्फत सर्वांना कळविण्यात येत आहे.
गोजगे येथील महाकलमेश्वर मंदिर
गोजगे येथील महाकलमेश्वर मंदिरामध्ये शिवरात्री उत्सवानिमित्त शिवरात्री उत्सव मंडळाच्यावतीने शुक्रवारी पहाटेपासून अनेक भाविकांच्या उपस्थितीत शिवपिंडीवर अभिषेक, पूजा, महाआरती करून भक्तांना तीर्थप्रसादाचे वितरण करण्यात आले. शुक्रवारी रात्री लव कुमार नार्वेकर बेळगाव यांचे प्रवचन आणि कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याचा अनेक भाविकांनी लाभ घेतला. शनिवारी दुपारी 1 ते 4 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी गोजगे आणि परिसरातील भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे शिवरात्र उत्सव मंडळातर्फे कळविण्यात आले आहे. तुरमुरी येथील कलमेश्वर मंदिरामध्ये भाविकांच्या उपस्थितीत शुक्रवारी शिवपिंडीवर अभिषेक, पूजा, आरती आणि तीर्थप्रसादाचे वितरण करण्यात आले. सर्व भाविकांच्या उपस्थितीत महाशिवरात्रीचा उत्सव पार पडला. तसेच सुळगा (हिं.)येथील ब्रह्मलिंग मंदिरामध्ये शिवरात्रीचे औचित्य साधून अभिषेक, पूजा महाआरती आणि तीर्थप्रसाद वितरण करण्यात आले. बेनकनहळ्ळी येथील ब्रह्मलिंग मंदिरामध्येही गावातील भाविकांच्या उपस्थितीत अभिषेक, पूजा महाआरती व तीर्थप्रसादाचे वितरण करण्यात आले. कल्लेहोळ येथील कलमेश्वर मंदिरामध्येही शुक्रवारी पहाटेपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी शिवपिंडीवर अभिषेक, पूजा, महाआरती करून उपस्थित भक्तांना तीर्थप्रसादाचे वितरण करण्यात आले.
राजहंसगडावरील श्री सिद्धेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्साहात
वार्ताहर /धामणे : राजहंसगडावरील श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे देवस्थान पंच कमिटीच्यावतीने शुक्रवार दि. 8 रोजी महाशिवरात्रीनिमित्त सकाळी 6 वा. सिद्धेश्वर देवाला विधिपूर्वक पूजन करण्यात आले. त्यानंतर ह.भ.प. शिवानंद मठपती यांच्या सानिध्यात अभिषेक घालण्यात आले. दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त पंचकमिटीच्यावतीने होणाऱ्या पूजेप्रसंगी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी राजहंसगड येथील देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण थोरवत, हणमंत नावगेकर, गुरुदास लोखंडे, सिप्पय्या बुर्लकट्टी, महादेव चव्हाण, गणपत जाधव, ज्ञानेश्वर नरवडे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.