श्रीनगर, जम्मू आणि काश्मीरच्या बाहेरील जबरवान जंगल परिसरात चकमक सुरू आहे. रविवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दाचीगाम आणि निशात भागातील जंगल परिसरात सकाळी 9 वाजेच्या सुमारास चकमक सुरु झाली. या परिसराचा सुरक्षा दलांनी वेढा घातला. या परिसरात शोध मोहिंम राबविली नंतर दहशतवाद्यांनी गोलीबार सुरु केला. या चकमकीत अद्याप कोणतीही जीवित हानि झाल्याचे वृत्त नाही.
श्रीनगरच्या इशबार भागाच्या मागे असलेल्या झाबरवान जंगल परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली आहे. गोळीबार अधूनमधून सुरू आहे. दोन दहशतवादी अडकल्याची माहिती आहे. याशिवाय किश्तवाडमधील चास भागात दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक सुरू झाली आहे.
या कारवाईत पॅरा स्पेशल फोर्सचाही सहभाग आहे. गोळीबार सुरूच आहे.
यापूर्वी सोपोरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते. गुरुवारी रात्रीपासून ही चकमक सुरू होती.
यापूर्वी कुपवाडाच्या लोलाब जंगलात एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले होते. याआधी मंगळवारी बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला, तर दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले.
Edited By – Priya Dixit