‘देर आये दुरुस्त आये’
काँग्रेस रोड गतिरोधकावर ओढले पांढरे पट्टे
बेळगाव : नेहमी पादचाऱ्यांची व वाहनचालकांची वर्दळ असणाऱ्या काँग्रेस रोडवर व अशास्त्रीय गतिरोधकांमुळे सतत अपघात होत होते. हे गतिरोधक अंधारात लक्षात येत नसल्याने अलीकडच्या काही दिवसात अपघाताच्या संख्येत वाढ झाली होती. हे लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते बसवराज हिरेमठ यांनी स्वत: रंग आणून या गतिरोधकांवर पांढरे पट्टे ओढले होते. परंतु हा रंग वाळू देण्याइतका अवधी सुद्धा नागरिकांनी दिला नाही. आणि गतिरोधकावरूनच वाहने हाकल्याने रंग उडून गेला होता. यासंदर्भात ‘प्रशासनाचे दुर्लक्ष, सामाजिक कार्यकर्त्यांनी दिले लक्ष’ अशा आशयाचे वृत्त दोन दिवसांपूर्वी ‘तऊण भारत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेऊन वाहतूक पोलीस विभागाने रविवारी या गतिरोधकावर पांढऱ्या रंगाने पट्टे ओढले. यामुळे प्रशासनाच्या व पोलीस दलाच्या या कामगिरीबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. ‘देर आये दुऊस्त आये’ अशी प्रतिक्रिया व्यक्त करतानाच जेव्हाही गतिरोधक बांधण्यात येतात तेव्हाच ते शास्त्रीय पद्धतीने बांधले जावेत, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
Home महत्वाची बातमी ‘देर आये दुरुस्त आये’
‘देर आये दुरुस्त आये’
काँग्रेस रोड गतिरोधकावर ओढले पांढरे पट्टे बेळगाव : नेहमी पादचाऱ्यांची व वाहनचालकांची वर्दळ असणाऱ्या काँग्रेस रोडवर व अशास्त्रीय गतिरोधकांमुळे सतत अपघात होत होते. हे गतिरोधक अंधारात लक्षात येत नसल्याने अलीकडच्या काही दिवसात अपघाताच्या संख्येत वाढ झाली होती. हे लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते बसवराज हिरेमठ यांनी स्वत: रंग आणून या गतिरोधकांवर पांढरे पट्टे ओढले होते. परंतु […]
