राजकन्येसारखे नटण्याचे मिळतात पैसे
दर तासाला होते हजारोंची कमाई
लहानपणी प्रत्येकाला कार्टून आवडायचे. याचमुळे अनेक मुले स्वत:च्या पसंतीच्या कार्टूनप्रमाणे तयार होण्याची इच्छा बाळगून असतात. कार्टूनप्रमाणे कपडे घालण्याचे, दिसण्याची त्यांची इच्छा असते. परंतु मोठेपणी या सर्व गोष्टी बालिश वाटू लागतात. पण एका महिलेने स्वत:च्या बालपणीच्या छंदाला प्रोफेशनचे स्वरुप दिले आहे. अमेरिकेतील ही महिला कार्टून व्यक्तिरेखांमधील राजकन्येप्रमाणे नटते आणि असे करून पैसे देखील कमावते.
लॉस एंजिलिस येथील 27 वर्षीय माया ब्राउनला बालपणापासूनच डिस्नेच्या कार्टून्सवर प्रचंड प्रेम होते. हायस्कूलमध्ये असताना प्रोफेशनल प्रिन्सेस होण्याची ती इच्छा बाळगून असायची. शाळेत फॅन्सी डेस स्पर्धा असताना ती राजकन्येप्रमाणे तयार होऊन जात होती. तिचे हे स्वप्न या वयात पूर्ण झाले आहे.
फेब्रुवारी 2022 मध्ये मायाने राजकन्येप्रमाणे तयार व्हावे लागणारी नोकरी पकडली आणि आता ती मुलांच्या पार्ट्यांमध्ये जात त्यांचे मनोरंजन करते. कधी ती अलादिन कार्टूनमधील जास्मिन होते, तर कधी मोआनाचे रुप धारण करते. या पार्ट्यांमध्ये ती राजकुमारी म्हणून वावरते. तिला तयार होण्यासाठी एक तासाचा वेळ लागतो.
माया 1 तासाकरता 8 हजार रुपयांहून अधिक कमाई करते. ती एका दिवसात दोन पार्ट्यांमध्ये सामील होते. तेथे जात ती मुलांसोबत वेळ घालविते. त्यांच्यासोबत केक कापते, त्यांना कहाण्या ऐकविते, खेळते आणि छायाचित्रे काढून घेते. रुपयांपेक्षा माझ्यासाठी हा अनुभव महत्त्वाचा आहे, कारण डिस्नेलँडला न जाऊ शकणाऱ्या मुलांचे यामुळे समाधान होते असे तिचे सांगणे आहे.
Home महत्वाची बातमी राजकन्येसारखे नटण्याचे मिळतात पैसे
राजकन्येसारखे नटण्याचे मिळतात पैसे
दर तासाला होते हजारोंची कमाई लहानपणी प्रत्येकाला कार्टून आवडायचे. याचमुळे अनेक मुले स्वत:च्या पसंतीच्या कार्टूनप्रमाणे तयार होण्याची इच्छा बाळगून असतात. कार्टूनप्रमाणे कपडे घालण्याचे, दिसण्याची त्यांची इच्छा असते. परंतु मोठेपणी या सर्व गोष्टी बालिश वाटू लागतात. पण एका महिलेने स्वत:च्या बालपणीच्या छंदाला प्रोफेशनचे स्वरुप दिले आहे. अमेरिकेतील ही महिला कार्टून व्यक्तिरेखांमधील राजकन्येप्रमाणे नटते आणि असे करून […]