आगीच्या घटनांपासून नुकसान टाळणे गरजेचे

जनतेत सतर्कतेची गरज : गवतगंजींना आग लागण्याच्या घटनांमुळे शेतकरी चिंतेत,  अनेकांना आर्थिक फटका वार्ताहर /नंदगड शॉर्टसर्किटमुळे तर काही ठिकाणी आगीच्या ठिणग्या पडून व काही ठिकाणी गॅस गळतीमुळे तसेच नकळत लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या नुकसानीपासून दूर राहण्यासाठी जनतेत सतर्कता महत्त्वाची आहे. खानापूर तालुक्यात गेल्या काही महिन्यात हलशीवाडी, पूर, जळगा, बिडी येथे भाताच्या […]

आगीच्या घटनांपासून नुकसान टाळणे गरजेचे

जनतेत सतर्कतेची गरज : गवतगंजींना आग लागण्याच्या घटनांमुळे शेतकरी चिंतेत,  अनेकांना आर्थिक फटका
वार्ताहर /नंदगड
शॉर्टसर्किटमुळे तर काही ठिकाणी आगीच्या ठिणग्या पडून व काही ठिकाणी गॅस गळतीमुळे तसेच नकळत लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या नुकसानीपासून दूर राहण्यासाठी जनतेत सतर्कता महत्त्वाची आहे. खानापूर तालुक्यात गेल्या काही महिन्यात हलशीवाडी, पूर, जळगा, बिडी येथे भाताच्या वळ्dयाना तर काही ठिकाणी गवतगंजीला आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेडेगाळी, चापगाव येथील शेतवडीत उसाच्या फडाला आग लागून नुकसान झाले आहे. तसेच खानापूर शहरातही गॅस गळतीमुळे आग लागून संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले होते. तोपिनकट्टी येथील निलगिरी बागेलाही आग लागून झाडे जळाल्याचा प्रकार घडला होता. खानापूर येथे एका बँकेच्या शाखेत शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. तर वाद्याच्या दुकानात लागलेल्या आगीमुळेही बरेच नुकसान झाले होते. खानापूर शहरासह ग्रामीण भागात कचऱ्याला आग लावण्याचे प्रकार सर्वत्र दिसून येत आहे. गवतगंजीला नेमकी आग कशी लागली. अशा लागणाऱ्या आगीमुळे गवतगंजीचे रक्षण करता येईल का, याबद्दल विचार होणे गरजेचे आहे. वाढलेले गवत कापल्यावर त्या ठिकाणी चांगले गवत यावे म्हणून अनेकजण माळरानावर आग लावतात. त्यामुळे थोडी दुर्घटना घडण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
पालापाचोळा जाळताना खबरदारीची गरज
या संदर्भात खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. त्यामुळे गवताचा साठा केलेल्या ठिकाणी चोहोबाजूने ख•ा खणावा. दोन गंजीमध्ये किमान अंतर असावे. त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असावी. माळरानावर कचरा पेटवताना चार जणांच्या उपस्थितीत जाळावा. सिगारेट सोडल्यावर ती पूर्णपणे विझली आहे का हे तपासून पहावे. झाडाखाली कचरा पेटवण्याचे टाळावे. गावातील कचरा असल्यास त्याचा कंपोस्ट खतासाठी वापर करावा. तसेच गवतगंजाच्या बाजूला कुठल्याही प्रसंगावरून फटाके वाजवण्याचे प्रयत्न टाळावेत. याशिवाय तालुक्याच्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू झाला आहे. ऊसतोडणी झाल्यानंतर शेतात राहिलेला उसाचा पाळापाचोळा आहे. त्या ठिकाणी जाळला जातो. त्यामुळे जमीन गरम होऊन नवीन ऊस वाढावा यासाठी पोषक वातावरण बनू शकते. पण तो पालापाचोळा जाळताना त्याच्या ठिकाणी अन्य ठिणगी पडणार नाही त्याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. तशी ठिणगी पडून देखील त्या शेताच्या बाजूला असलेल्या गवतगंज्या जळू शकतात. त्यामुळे ठिणगी कुठे पडली यावर नजर ठेवून ती तातडीने विझवणे गरजेचे आहे. तसेच ऊस फडातील पालापाचोळा जाळताना त्याची आग फडाबाहेर जाणार नाही. यासाठी चारी बाजूने त्यावर देखरेख ठेवावी. याशिवाय तालुक्यात शेतवडीतून जाणाऱ्या वीजवाहिन्या देखील गवतगंज्यांना मारक ठरू शकतात. एखाद्या वेळी जोराच्या वाऱ्यामुळे वीजवाहिन्या एकमेकाला घासल्या तरी त्यामधून निर्माण होणारी ठिणगी गवतगंजीमध्ये पडली तर गवतगंजी बघताबघता भस्मसात होते. त्यामुळे वीजवाहिन्या जाणाऱ्या मार्गात गवतगंज्या ठेवणेही धोकादायक असू शकते.
ग्रामस्थांच्या दुर्लक्षामुळे आगीच्या वाढत्या घटना
दरवर्षी हिवाळ्dयात आगीच्या घटना अधिक घडतात. खेडेगावात गवतगंजीच्या शेजारीच अनेकजण कचरा टाकण्यासाठी ख•ा मारतात. या ख•dयातील कचऱ्यामध्ये चुलीची गरम राख आणून टाकली जाते. गरम राखेमुळे सुक्या कचऱ्याला आग लागून वाऱ्यामुळे आगीच्या ठिणग्या पडून गवतगंजी जळाल्याच्या घटना घडतात. अर्धवट ओढलेली सिगारेट मोकळ्dया रानावर व इतर ठिकाणी फेकली जाते. वाऱ्याच्या अधिक वेगाने तेथील गवताला आग लागते. शहरात खुल्या जागेत कचरा पेटवण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे जवळची झाडे पेट घेत आहेत. गवत गंजीचे आगीपासून रक्षण करण्यासाठी सुरक्षित ठिकाणी आग पेटवणे गरजेचे बनले आहे.