स्वातंत्र्य दिनापूर्वी दिल्ली पोलिसांना मोठे यश, ISIS दहशतवादी रिझवान अलीला अटक

दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी ISIS मॉड्यूलच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. रिजवान अली असे ISIS मॉड्यूलच्या दहशतवाद्याचे नाव आहे. तपास यंत्रणा एनआयएने त्याच्यावर तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. रिझवान हा दिल्लीतील …

स्वातंत्र्य दिनापूर्वी दिल्ली पोलिसांना मोठे यश, ISIS दहशतवादी रिझवान अलीला अटक

दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी ISIS मॉड्यूलच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. रिजवान अली असे ISIS मॉड्यूलच्या दहशतवाद्याचे नाव आहे. तपास यंत्रणा एनआयएने त्याच्यावर तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. रिझवान हा दिल्लीतील दर्यागंजचा रहिवासी आहे.

रिझवान हा पुणे ISIS मॉड्यूलचा मोस्ट वाँटेड दहशतवादी असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून शस्त्रेही सापडली आहेत. तपास यंत्रणा एनआयएने रिझवानला वाँटेड घोषित केले होते. तो बराच काळ फरार होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी रिजवान अलीबद्दल गुप्त माहिती मिळाली आणि त्याला पोलिसांनी गुरुवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास दिल्लीतील बायोडायव्हर्सिटी उद्याना जवळील गंगा बक्ष मार्गाजवळ अटक केली. त्याच्या ताब्यातून 30 बोअरचे स्टार पिस्तूल व तीन काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Edited by – Priya Dixit 

 

Go to Source