राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात युतीची शक्यता?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात युती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज राज ठाकरे यांच्या घरी शिवतीर्थवर भेट घेतली. तसेच दोन्ही ठाकरेंमध्ये पहिल्यांदाच राजकीय बैठक होत आहे. याआधी कौटुंबिक कारणास्तव ठाकरे बंधूमध्ये भेटीगाठी होत होत्या. या भेटीवरून राजकीय स्तरातून चर्चांना उधाण आले आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते. त्यावेळेस आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे या भेटीतून युती होणार असल्याचे अनेक समाज माध्यमातून म्हटले जात आहे. सुत्रांनुसार येत्या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची घोषणा होणार असल्याचे म्हटले जात आहे. राज ठाकरे यांनी उद्या त्यांच्या पक्षाची बैठक बोलावली आहे त्यामुळे युतीबाबत दोन्ही ठाकरे सकारात्मक आहेत असं म्हटले जात आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात युतीची शक्यता?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात युती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज राज ठाकरे यांच्या घरी शिवतीर्थवर भेट घेतली. तसेच दोन्ही ठाकरेंमध्ये पहिल्यांदाच राजकीय बैठक होत आहे. याआधी कौटुंबिक कारणास्तव ठाकरे बंधूमध्ये भेटीगाठी होत होत्या.या भेटीवरून राजकीय स्तरातून चर्चांना उधाण आले आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते. त्यावेळेस आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे या भेटीतून युती होणार असल्याचे अनेक समाज माध्यमातून म्हटले जात आहे.सुत्रांनुसार येत्या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची घोषणा होणार असल्याचे म्हटले जात आहे. राज ठाकरे यांनी उद्या त्यांच्या पक्षाची बैठक बोलावली आहे त्यामुळे युतीबाबत दोन्ही ठाकरे सकारात्मक आहेत असं म्हटले जात आहे.

Go to Source