कृत्रिम सूर्यनिर्मिती शक्य ?

सूर्याची ऊर्जा प्रदीर्घ काळपर्यंत पुरणारी आहे. तथापि, पृथ्वीवरील किंवा पृथ्वीच्या पोटातील ऊर्जा आणि इंधन स्रोत मर्यादित आहेत. मानवाची ऊर्जेची आवश्यकता दिवसेंदिवस वाढत चालल्याने तो मोठ्या प्रमाणात पृथ्वीकडे उपलब्ध असणाऱ्या ऊर्जा आणि इंधन स्रोतांचे शोषण अनियंत्रित प्रमाणात करीत आहे. त्यामुळे हे स्रोत येत्या पाच ते सहा दशकांमध्येच संपुष्टात येतील अशी शक्यता आहे. शिवाय, या ऊर्जास्रोतांच्या अनिर्बंध […]

कृत्रिम सूर्यनिर्मिती शक्य ?

सूर्याची ऊर्जा प्रदीर्घ काळपर्यंत पुरणारी आहे. तथापि, पृथ्वीवरील किंवा पृथ्वीच्या पोटातील ऊर्जा आणि इंधन स्रोत मर्यादित आहेत. मानवाची ऊर्जेची आवश्यकता दिवसेंदिवस वाढत चालल्याने तो मोठ्या प्रमाणात पृथ्वीकडे उपलब्ध असणाऱ्या ऊर्जा आणि इंधन स्रोतांचे शोषण अनियंत्रित प्रमाणात करीत आहे. त्यामुळे हे स्रोत येत्या पाच ते सहा दशकांमध्येच संपुष्टात येतील अशी शक्यता आहे.
शिवाय, या ऊर्जास्रोतांच्या अनिर्बंध उपयोगामुळे पर्यावरणाची हानी होत असून ती तशीच होत राहिली, तर काही काळातच पृथ्वीवरील जीवसृष्टी धोक्यात येऊ शकते, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. त्यामुळे गेल्या दोन दशकांपासून मानव चिरस्थायी पर्यावरणस्नेही ऊर्जास्रोत विकसीत करण्यासाठी संशोधन करीत आहे. जगभरातील सहस्रावधी संशोधकांनी या कामात स्वत:ला गुंतविले आहे.
कृत्रिम सूर्याची निर्मिती हा असाच एक स्रोत विकसीत करण्याचा प्रकल्प आहे. प्रारंभी हा प्रकार केवळ काल्पनिक आहे, अशी अनेकांची समजूत होती. पण या निर्मितीला आता काही प्रमाणात यश येऊ लागले आहे, असे प्रतिपादन संशोधकांनी केले आहे. ‘जॉईंट युरोपियन टॉरस’ अतंर्गत हा प्रयोग होत असून ब्रिटीश संशोधकांनी यात मोठी प्रगती साध्य केली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. न्यूक्लिअर फ्युजन’ किंवा अणुकेंद्रीय संमिलीकरण’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रदीर्घ काळपर्यंत साऱ्या पृथ्वीला ऊर्जा देत राहील अशा प्रतिसूर्याची निर्मिती करणे शक्य आहे असा विश्वास संशोधकांना वाटू लागला आहे.
यासाठी ‘टोकामॅक’ नामक एका अतिप्रचंड यंत्राला उपयोग केला जात आहे. या यंत्राचा उपयोग करुन वैज्ञानिकांनी केवळ 0.2 मिलिग्राम अण्विक इंधनाचा उपयोग करुन 5 सेकंदांसाठी 69 मेगाज्यूल इतकी प्रचंड ऊर्जा प्राप्त करण्यात यश मिळविले. सूर्यावर ज्या प्रमाणे ऊर्जानिर्मिती होते, तशाच प्रकारे ती प्राप्त करण्यात आली. ती 12 हजार घरांना अखंड वीज पुरविण्याइतकी आहे. हा प्रयोग व्यापारी तत्वावर यशस्वी झाल्यास प्रदीर्घ काळ पृथ्वीला पर्यावरणस्नेही ऊर्जा मिळू शकेल, असे संशोधकांचे म्हणणे आहे. अर्थातच, सध्याच्या काळात हे संशोधन बाल्यावस्थेत आहे. पण त्यामुळे आशेचा किरण स्पष्ट दिसू लागला आहे, हे निश्चित आहे.