अवजड वाहतूक रोखण्यासाठी मिलिटरी महादेव मंदिर येथे कमान

बेळगाव : कॅम्पमधून अवजड वाहतूक बंद करावी, अशी सूचना ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी कॅन्टोन्मेंट बैठकीत केली होती. त्यानुसार पॅम्पमधील अंतर्गत भागात अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. गांधी पुतळा, ग्लोब थिएटर येथे लोखंडी कमानी उभारल्यानंतर आता मिलिटरी महादेव मंदिर येथेही लोखंडी कमान उभारून अवजड वाहतूक बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. गोगटे सर्कल येथे रहदारी पोलीस […]

अवजड वाहतूक रोखण्यासाठी मिलिटरी महादेव मंदिर येथे कमान

बेळगाव : कॅम्पमधून अवजड वाहतूक बंद करावी, अशी सूचना ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी कॅन्टोन्मेंट बैठकीत केली होती. त्यानुसार पॅम्पमधील अंतर्गत भागात अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. गांधी पुतळा, ग्लोब थिएटर येथे लोखंडी कमानी उभारल्यानंतर आता मिलिटरी महादेव मंदिर येथेही लोखंडी कमान उभारून अवजड वाहतूक बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. गोगटे सर्कल येथे रहदारी पोलीस अडवणूक करत असतात. पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी अनेक अवजड वाहनधारक कॅम्पमार्गे मिलिटरी महादेव मंदिर असा प्रवास करतात. कॅम्प भागात अनेक शाळा असल्यामुळे अवजड वाहतूक करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. दोन वर्षांपूर्वी एका ट्रक चालकाने ठोकरल्याने एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता.
अपघाताचे प्रकार वारंवार घडू नयेत यासाठी कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी अवजड वाहतूक बंद करण्याचे निर्देश दिले होते. उभा मारुती व ग्लोब थिएटर कॉर्नर येथे मागील दोन महिन्यांपासून मराठा इन्फंट्रीचे जवान तैनात करण्यात आले होते. त्यानंतर हिंडलगा रोड येथील गांधी पुतळा व ग्लोब थिएटर येथे लोखंडी कमान उभारून अवजड वाहतूक बंद करण्यात आली. तसेच ठिकठिकाणी अवजड वाहतुकीवर बंदी असल्याचे फलक लावण्यात आले आहेत. अवजड वाहतूक रोखण्यासाठी मिलिटरी महादेव मंदिर येथे यापूर्वी लोखंडी कमान लावण्यात आली होती. परंतु मध्यंतरी एका वाहनाने कमानीला ठोकरल्याने कमान काढण्यात आली होती. त्यानंतर या मार्गावरून अवजड वाहतूक सुरू होती. पुन्हा लोखंडी कमान बसविण्यात आल्याने आता तरी अवजड वाहतूक रोखली जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.