आयर्लंडची लढत आज कॅनडाशी

वृत्तसंस्था /न्यूयॉर्क आयर्लंडचा सामना आज शुक्रवारी येथे धोकादायक कॅनडाशी होणार असून याप्रसंगी आपले अनुभवी फलंदाज अँडी बालबर्नी, पॉल स्टर्लिंग आणि हॅरी टेक्टर यांच्या आधारे भारताने दिलेल्या धक्क्यातून सावरून आपली टी-20 विश्वचषक मोहीम पुन्हा ऊळावर आणण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जाईल. बुधवारी भारताविऊद्ध आयर्लंडचा आठ गड्यानी पराभव झाला, तर सहयजमान कॅनडाला अमेरिकेने सात गडी राखून पराभूत केले. […]

आयर्लंडची लढत आज कॅनडाशी

वृत्तसंस्था /न्यूयॉर्क
आयर्लंडचा सामना आज शुक्रवारी येथे धोकादायक कॅनडाशी होणार असून याप्रसंगी आपले अनुभवी फलंदाज अँडी बालबर्नी, पॉल स्टर्लिंग आणि हॅरी टेक्टर यांच्या आधारे भारताने दिलेल्या धक्क्यातून सावरून आपली टी-20 विश्वचषक मोहीम पुन्हा ऊळावर आणण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जाईल. बुधवारी भारताविऊद्ध आयर्लंडचा आठ गड्यानी पराभव झाला, तर सहयजमान कॅनडाला अमेरिकेने सात गडी राखून पराभूत केले. त्यामुळे कॅनडाही सावरण्यासाठी उत्सुक असेल. आपल्या आठव्या टी-20 विश्वचषकात खेळणाऱ्या आयर्लंडने त्यांचे अनेक प्रमुख खेळाडू इंग्लिश काऊंटीमध्ये खेळत असूनही या स्पर्धेत छाप पाडण्याच्या बाबतीत अनेकदा संघर्ष केला आहे. 2009 मध्ये एकदाच त्यांनी ‘सुपर 8’मध्ये स्थान मिळवले होते. नासाऊ कंट्री स्टेडियमच्या कठीण खेळपट्टीवर प्रतिस्पर्धी कर्णधार रोहित शर्मा आणि रिषभ पंत यांनी आपल्या फलंदाजीने मार्ग दाखविलेला असला, तरी 250 हून अधिक टी-20 सामन्यांचा एकत्रित अनुभव असलेल्या बालबर्नी आणि कर्णधार स्टर्लिंग यांना संघाला चांगली सुऊवात करून देता आली नाही. 77 ‘टी-20’ सामन्यांचा अनुभव असलेल्या टेक्टरला देखील चांगली सुऊवात करण्यात अपयश आले. आयर्लंड दोन दिवसांत या मैदानावर त्यांचा दुसरा सामना खेळणार असून पराभवातून धडा घेण्यास ते उत्सुक असतील.
 सामन्याची वेळ : भारतीय वेळेनुसार रात्री 8 वा.