आयर्लंडची पहिल्या डावात 108 धावांची आघाडी
एकमेव कसोटी दुसरा दिवस : दिवसभरात 9 बळी, अफगाण दु. डाव 3 बाद 134
वृत्तसंस्था /टॉलरन्स ओव्हल
येथे सुरू असलेल्या एकमेव कसोटीत अफगाण विरुद्ध आयर्लंडने आपली स्थिती अधिक मजबूत केली आहे. या सामन्यात खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर अफगाणने दुसऱ्या डावात 3 बाद 134 धावा जमवित 26 धावांची बढत मिळविली आहे. तत्पूर्वी आयर्लंडने पहिल्या डावात 108 धावांची आघाडी मिळविली होती. गुरुवारी दिवसभरात 9 गडी बाद झाले. या सामन्यात अफगाणचा पहिला डाव 155 धावांत आटोपला. सलामीच्या इब्राहिम झद्रनने 83 चेंडूत 9 चौकारांसह 53 तर करिम जेनतने 78 चेंडूत 6 चौकारांसह नाबाद 41, कर्णधार शाहिदीने 4 चौकारांसह 20 तसेच नावेद झद्रनने 2 चौकारांसह 12 धावा जमविल्या. आयर्लंडतर्फे मार्क अॅडेर सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला. त्याने 39 धावात 5 गडी बाद केले. क्रेग यंग आणि कॅम्फर यांनी प्रत्येकी 2 तसेच मॅकार्थीने 1 गडी बाद केला.
आयर्लंडने 4 बाद 100 या धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. कर्टिस कॅम्फरने 64 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 49, टेक्टरने 3 चौकारांसह 32 धावा जमविल्या. पॉल स्टर्लिंगने 89 चेंडूत 7 चौकारांसह 52 धावा जमविताना टकेरसमवेत सहाव्या गड्यासाठी 80 धावांची भागिदारी केली. टकेरने 5 चौकारांसह 46 धावा जमविल्या. मॅकब्राईनने 74 चेंडूत 5 चौकारांसह 38 धावा जमविल्या. आयर्लंडच्या तळाच्या फलंदाजांनी समायोचित फलंदाजी केल्याने आयर्लंडला 250 धावांचा टप्पा ओलांडता आला. 83.4 षटकात आयर्लंडचा पहिला डाव 263 धावांत आटोपला. अफगाणतर्फे झिया उर रेहमानने 64 धावात 5 तर नावेद झद्रनने 59 धावांत 3 तसेच मसूद आणि झहिर खान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. आयर्लंडने अफगाणवर पहिल्या डावात 108 धावांची आघाडी घेतली. पहिल्या डावात पिछाडीवर असलेल्या अफगाणने अपाल्या दुसऱ्या डावाला प्रारंभ केला.
संक्षिप्त धावफलक
अफगाण प. डाव 54.5 षटकात सर्व बाद 155 (इब्राहिम झद्रन 53, शाहिदी 20, करिम जेनत नाबाद 41, नावेद झद्रन 12, अवांतर 11, मार्क अॅडेर 5-39, यंग 2-31, कॅम्फर 2-13, मॅकार्थी 1-28), आयर्लंड प. डाव 83.4 षटकात सर्व बाद 263 (कॅम्फर 49, टेक्टर 32, स्टर्लिंग 52, टकेथ 46, मॅकब्राईन 38, अॅडेर 15, मूर 12, अवांतर 10, झिया उर रेहमान 5-64, नावेद झद्रनने 3-59, मसूद 1-38, झहिर खान 1-67), अफगाण दु. डाव 37 षटकात 3 बाद 143 (इब्राहिम झद्रनने 12, नूरअली झद्रनने 32, रेहमत शहा 9, शाहिदी खेळत आहे 53, गुरबाज खेळत आहे 23, अवांतर 5, अॅडेर 2-23, मॅकार्थी 1-25).
Home महत्वाची बातमी आयर्लंडची पहिल्या डावात 108 धावांची आघाडी
आयर्लंडची पहिल्या डावात 108 धावांची आघाडी
एकमेव कसोटी दुसरा दिवस : दिवसभरात 9 बळी, अफगाण दु. डाव 3 बाद 134 वृत्तसंस्था /टॉलरन्स ओव्हल येथे सुरू असलेल्या एकमेव कसोटीत अफगाण विरुद्ध आयर्लंडने आपली स्थिती अधिक मजबूत केली आहे. या सामन्यात खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर अफगाणने दुसऱ्या डावात 3 बाद 134 धावा जमवित 26 धावांची बढत मिळविली आहे. तत्पूर्वी आयर्लंडने पहिल्या डावात 108 धावांची […]