संसद सुरक्षा प्रमुखपदी आयपीएस अधिकारी अनुराग अग्रवाल

तीन वर्षांपर्यंत सांभाळणार पदभार वृत्तसंस्था/ नवी दिल्ली आयपीएस अधिकारी अनुराग अग्रवाल यांना संसद सुरक्षा प्रमुखपदी नियुक्त करण्यात आली आहे. यासंबंधीची माहिती अधिकृत आदेशात देण्यात आली आहे. अग्रवाल हे सध्या सीआरपीएफमध्ये महानिरीक्षक आहेत. आसाम-मेघालय कॅडरच्या 1998 च्या तुकडीचे अधिकारी असलेल्या अग्रवाल यांना तीन वर्षांसाठी संयुक्त सचिव (सुरक्षा) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 13 डिसेंबर रोजी दोन […]

संसद सुरक्षा प्रमुखपदी आयपीएस अधिकारी अनुराग अग्रवाल

तीन वर्षांपर्यंत सांभाळणार पदभार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयपीएस अधिकारी अनुराग अग्रवाल यांना संसद सुरक्षा प्रमुखपदी नियुक्त करण्यात आली आहे. यासंबंधीची माहिती अधिकृत आदेशात देण्यात आली आहे. अग्रवाल हे सध्या सीआरपीएफमध्ये महानिरीक्षक आहेत. आसाम-मेघालय कॅडरच्या 1998 च्या तुकडीचे अधिकारी असलेल्या अग्रवाल यांना तीन वर्षांसाठी संयुक्त सचिव (सुरक्षा) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
13 डिसेंबर रोजी दोन युवकांकडून प्रेक्षक गॅलरीतून लोकसभा कक्षात उडी घेत पिवळ्या रंगाचा धूर सोडण्यात आला होता. यानंतर संसद भवन परिसराच्या सुरक्षेत व्यापक बदल करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर अग्रवाल हे स्वत:चा नवा पदभार सांभाळणार आहेत.
तत्कालीन संयुक्त सचिव रघुवीर लाल हे स्वत:च्या कॅडरमध्ये परतल्यानंतर 20 ऑक्टोबरपासून संयुक्त सचिव (सुरक्षा) हे पद रिक्त होते. संयुक्त सचिव (सुरक्षा) हे पद पारंपरिक स्वरुपात एका आयपीएस अधिकाऱ्याकडे असते.