भारत-पाकिस्तान संघर्ष : यंदाचं IPL स्थगित
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असताना आता इंडियन प्रिमियर लीग (IPL) अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. बीसीसीआयने (BCCI Suspended IPL 2025) मोठा निर्णय घेतला आहे. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना गुरुवारी रद्द झाला होता. त्यामुळे आयपीएलवर स्थगितीचे ढग होते. अशातच आता आयपीएलला अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआय लवकर यावर अधिकृत घोषणा करेल. तसेच सर्व परदेशी खेळाडूंना परत पाठवले जाईल. बीसीसीआय त्यांना सुरक्षितपणे परत पोहोचवेल याची खात्री करेल, अशी माहिती समोर आली आहे.
धर्मशाळा येथे रद्द झालेला दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना हंगामातील 58 वा सामना होता. या हंगामात एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. म्हणजे अजून 16 सामने शिल्लक आहेत. आगामी सामन्यांवर संकटाचे ढग दाटून येत आहेत. याचे कारण भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेला तणाव आहे. पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
दरम्यान, सीमाभागात परिस्थिती दररोज बदलत आहे. आम्हाला जे काही सांगितले जाईल ते आम्ही करू आणि सर्व भागधारकांना त्याबद्दल माहिती देऊ. सध्या आमची प्राथमिकता सर्व खेळाडू, चाहते आणि भागधारकांची सुरक्षा आहे, असं राजीव शुक्ला म्हणाले होते.
भारत आणि पाकिस्तान तणावानंतर आता आयपीएल खेळली जाणार की नाही? पुढचे सामने होणार की नाही याबद्दल शंका व्यक्त केली जात होती. गुजरात टायटन्स 11 मॅचमध्ये 8 सामने जिंकून पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे, तर आरसीबी 8 सामने जिंकून +0.482 रन रेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. पंजाब किंग्स 15 आणि मुंबई इंडियन्स 14 पॉईंट्ससह तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहे.
Home महत्वाची बातमी भारत-पाकिस्तान संघर्ष : यंदाचं IPL स्थगित
भारत-पाकिस्तान संघर्ष : यंदाचं IPL स्थगित
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असताना आता इंडियन प्रिमियर लीग (IPL) अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. बीसीसीआयने (BCCI Suspended IPL 2025) मोठा निर्णय घेतला आहे.
पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना गुरुवारी रद्द झाला होता. त्यामुळे आयपीएलवर स्थगितीचे ढग होते. अशातच आता आयपीएलला अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआय लवकर यावर अधिकृत घोषणा करेल.
तसेच सर्व परदेशी खेळाडूंना परत पाठवले जाईल. बीसीसीआय त्यांना सुरक्षितपणे परत पोहोचवेल याची खात्री करेल, अशी माहिती समोर आली आहे.धर्मशाळा येथे रद्द झालेला दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना हंगामातील 58 वा सामना होता. या हंगामात एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. म्हणजे अजून 16 सामने शिल्लक आहेत.आगामी सामन्यांवर संकटाचे ढग दाटून येत आहेत. याचे कारण भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेला तणाव आहे. पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.दरम्यान, सीमाभागात परिस्थिती दररोज बदलत आहे. आम्हाला जे काही सांगितले जाईल ते आम्ही करू आणि सर्व भागधारकांना त्याबद्दल माहिती देऊ. सध्या आमची प्राथमिकता सर्व खेळाडू, चाहते आणि भागधारकांची सुरक्षा आहे, असं राजीव शुक्ला म्हणाले होते.भारत आणि पाकिस्तान तणावानंतर आता आयपीएल खेळली जाणार की नाही? पुढचे सामने होणार की नाही याबद्दल शंका व्यक्त केली जात होती.गुजरात टायटन्स 11 मॅचमध्ये 8 सामने जिंकून पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे, तर आरसीबी 8 सामने जिंकून +0.482 रन रेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. पंजाब किंग्स 15 आणि मुंबई इंडियन्स 14 पॉईंट्ससह तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहे.