IPL 2024 Schedule : आयपीएल वेळापत्रक जाहीर, उद्घाटन सामना चेन्नई आणि आरसीबी यांच्यात

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या हंगामाचे वेळापत्रक गुरुवारी (22 फेब्रुवारी) जाहीर करण्यात आले आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज संघ पहिल्या सामन्यात खेळणार आहे. हा सामना 22 मार्च रोजी त्याच्या घरच्या मैदानावर एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. …

IPL 2024 Schedule : आयपीएल वेळापत्रक जाहीर, उद्घाटन सामना चेन्नई आणि आरसीबी यांच्यात

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या हंगामाचे वेळापत्रक गुरुवारी (22 फेब्रुवारी) जाहीर करण्यात आले आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज संघ पहिल्या सामन्यात खेळणार आहे. हा सामना 22 मार्च रोजी त्याच्या घरच्या मैदानावर एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. चेन्नईचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी (RCB) होणार आहे. 21 सामन्यांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे. चेन्नईचा संघ विक्रमी नवव्यांदा आयपीएलच्या कोणत्याही मोसमातील पहिला सामना खेळणार आहे. यापूर्वी, संघाने 2009, 2011, 2012, 2018, 2019, 2020, 2022 आणि 2023 मध्ये उद्घाटनसामना खेळला आहे. 

 

दिल्ली कॅपिटल्सचे पहिले दोन सामने विशाखापट्टणम येथे होणार आहेत. महिला प्रीमियर लीगचा अंतिम सामना दिल्लीत खेळवला जाईल, त्यानंतर लगेचच आयपीएलसाठी मैदान तयार करण्यास वेळ लागेल. त्यामुळे दिल्लीचे पहिले दोन सामने विशाखापट्टणम येथे होणार आहेत. देशात यावर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे आयपीएलचे पूर्ण वेळापत्रक जाहीर झालेले नाही. आता 17 दिवसांचा कार्यक्रम समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल.

 

IPL च्या पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक

सामना- तारीख- संघ- जागा

1- 22 मार्च- CSK vs RCB -चेन्नई

2- 23 मार्च -PBKS vs DC -मोहाली

3 -23 मार्च -KKR vs SRH -कोलकाता

4 -24 मार्च -RR vs LSG -जयपुर

5 -24 मार्च -GT vs MI -अहमदाबाद

6 -25 मार्च -RCB vs PBKS -बेंगलुरु

7 -26 मार्च -CSK vs GT -चेन्नई

8 -27 मार्च -SRH vs MI -हैदराबाद

9 -28 मार्च -RR vs DC -जयपुर

10 -29 मार्च -RCB vs KKR- बेंगलुरु

11 -30 मार्च -LSG vs PBKS -लखनौ

12 -31 मार्च -GT vs SRH -अहमदाबाद

13 -31 मार्च -DC vs CSK -विशाखापत्तनम

14 -1 एप्रिल -MI vs RR -मुंबई

15 -2 च -RCB vs LSG -बेंगलुरु

16 -3 एप्रिल- DC vs KKR -विशाखापत्तनम

17 -4 एप्रिल -GT vs PBKS -अहमदाबाद

18 -5 एप्रिल -SRH vs CSK -हैदराबाद

19 -6 एप्रिल-RR vs RCB -जयपुर

20 -7 एप्रिल-MI vs DC -मुंबई

21 -7 अप्रैल -LSG vs GT -लखनौ

 

संपूर्ण आयपीएल देशातच होणार 

आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ म्हणाले होते की संपूर्ण स्पर्धा भारतातच आयोजित केली जाईल. केवळ 2009 मध्ये आयपीएल संपूर्णपणे परदेशात (दक्षिण आफ्रिका) खेळली गेली, तर 2014 मध्ये सार्वत्रिक निवडणुकांमुळे, काही सामने UAE मध्ये खेळले गेले. तथापि 2019 मध्ये सार्वत्रिक निवडणुका असूनही ही स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली होती.