iphone 16 खरेदीसाठी मुंबईत ॲपल स्टोअरबाहेर झुंबड
आयफोनचया नव्या सिरिजच्या प्रतीक्षेत अनेक नागरिक होते. त्यांची ही प्रतीक्षा अखेर संपली असून आयफोनने 16 सिरिज भारतात लाँच केली आहे. या नव्या सिरिजमध्ये आतापर्यंतचे सर्वांत दमदार फिचर्स देण्यात आले आहे. हा फोन 13 सप्टेंबरपासून भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाला होता. अनेकांनी याची ऑर्डर दिली होती. दरम्यान, आज पासून हा फोन खरेदी करता येणार असल्याने मुंबईतील बीकेसी अॅपल स्टोअरबाहेर आज सकाळ पासून फोन खरेदी साठी नागरिकांनी रांगा लावल्या आहेत. जगातील आघाडीची टेक कंपनी अॅपलने मुंबईत बीकेसीमध्ये अॅपल स्टोअर सुरू केले आहे. या स्टोअरला अॅपल बीकेसी असे नाव देण्यात आले आहे. या सेंटरमध्ये अॅपलचे प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी नागरिकांनी पसंती दर्शवली आहे. दरम्यान, अॅपलने आयफोन 16 ची नवी सिरिज बाजारात आणली आहे. यात आयफोन 16 प्लस, आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश आहे. हे नवीन डिव्हाइस खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांनी विविध चॅनेलद्वारे प्री-बुकिंग केली आहे.आज पासून फोन विक्रीसाठी उपलब्धभारतीय बाजरात 13 सप्टेंबरपासून या फोनची प्री बूकिंग सुरू झाली आहे. तर आज पासून (दि 20) हा फोन विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या फोन खरेदीसाठी नागरिकांनी आज सकाळ पासून मुंबईच्या बीकेसी स्टोअरसमोर रांगा लावल्याचे चित्र आहे.भारतीय बाजारपेठेत, आयफोन 16 ची किंमत 79,900 रुपयांपासून सुरू होते आणि आय फोन 16 प्लसची किंमत 89,900 रुपयांपासून सुरू होते. या दोन्हींच्या बेस मॉडेलमध्ये 128 जीबी स्टोरेज आहे. हा फोन 5 रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. यात अल्ट्रामॅरिन, टील, गुलाबी, पांढरा आणि काळा. तर, आयफोन 16 प्रो (128 जीबी) ची किंमत 119900 रुपयांपासून सुरू होते आणि आयफोन 16 प्रो मॅक्स (256 जीबी) ची किंमत 144900 रुपयांपासून सुरू होते. प्रो मॉडेल ब्लॅक टायटॅनियम, व्हाइट टायटॅनियम, नॅचरल टायटॅनियम आणि डेझर्ट टायटॅनियम या 4 रंगामध्ये हा फोन येतो.हेही वाचामाथेरानमधील टॉय ट्रेनला पावसाळ्यात नाही लागणार ब्रेक
Home महत्वाची बातमी iphone 16 खरेदीसाठी मुंबईत ॲपल स्टोअरबाहेर झुंबड
iphone 16 खरेदीसाठी मुंबईत ॲपल स्टोअरबाहेर झुंबड
आयफोनचया नव्या सिरिजच्या प्रतीक्षेत अनेक नागरिक होते. त्यांची ही प्रतीक्षा अखेर संपली असून आयफोनने 16 सिरिज भारतात लाँच केली आहे. या नव्या सिरिजमध्ये आतापर्यंतचे सर्वांत दमदार फिचर्स देण्यात आले आहे.
हा फोन 13 सप्टेंबरपासून भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाला होता. अनेकांनी याची ऑर्डर दिली होती. दरम्यान, आज पासून हा फोन खरेदी करता येणार असल्याने मुंबईतील बीकेसी अॅपल स्टोअरबाहेर आज सकाळ पासून फोन खरेदी साठी नागरिकांनी रांगा लावल्या आहेत.
जगातील आघाडीची टेक कंपनी अॅपलने मुंबईत बीकेसीमध्ये अॅपल स्टोअर सुरू केले आहे. या स्टोअरला अॅपल बीकेसी असे नाव देण्यात आले आहे. या सेंटरमध्ये अॅपलचे प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी नागरिकांनी पसंती दर्शवली आहे.
दरम्यान, अॅपलने आयफोन 16 ची नवी सिरिज बाजारात आणली आहे. यात आयफोन 16 प्लस, आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश आहे. हे नवीन डिव्हाइस खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांनी विविध चॅनेलद्वारे प्री-बुकिंग केली आहे.
आज पासून फोन विक्रीसाठी उपलब्ध
भारतीय बाजरात 13 सप्टेंबरपासून या फोनची प्री बूकिंग सुरू झाली आहे. तर आज पासून (दि 20) हा फोन विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या फोन खरेदीसाठी नागरिकांनी आज सकाळ पासून मुंबईच्या बीकेसी स्टोअरसमोर रांगा लावल्याचे चित्र आहे.
भारतीय बाजारपेठेत, आयफोन 16 ची किंमत 79,900 रुपयांपासून सुरू होते आणि आय फोन 16 प्लसची किंमत 89,900 रुपयांपासून सुरू होते. या दोन्हींच्या बेस मॉडेलमध्ये 128 जीबी स्टोरेज आहे. हा फोन 5 रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. यात अल्ट्रामॅरिन, टील, गुलाबी, पांढरा आणि काळा.
तर, आयफोन 16 प्रो (128 जीबी) ची किंमत 119900 रुपयांपासून सुरू होते आणि आयफोन 16 प्रो मॅक्स (256 जीबी) ची किंमत 144900 रुपयांपासून सुरू होते. प्रो मॉडेल ब्लॅक टायटॅनियम, व्हाइट टायटॅनियम, नॅचरल टायटॅनियम आणि डेझर्ट टायटॅनियम या 4 रंगामध्ये हा फोन येतो.हेही वाचा
माथेरानमधील टॉय ट्रेनला पावसाळ्यात नाही लागणार ब्रेक