गुंतवणूकदार ‘टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर सावध
धातू -आयटीचा बाजारात दबाव : सेन्सेक्स 176.43 अंकांनी प्रभावीत
मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बुधवारी अमेरिकेकडून जगभरातील विविध देशांवर लागू करण्यात आलेल्या कराराच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारातील गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याचे बुधवारी दिसून आले.
यामध्ये धातू आणि आयटी क्षेत्राच्या दबावाचा परिणाम भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात झाला असून यामध्ये बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले. आशियातील बाजारांमध्ये मिळताजुळता कल राहिला. परंतु आगामी काळात ही बाजाराची दिशा कोणता कल घेणार याबाबत आताच अंदाज बांधणे कठीण असल्याचे मत काही शेअर बाजार अभ्यासक व्यक्त करत आहेत. मात्र बुधवारी बीएसई सेन्सेक्स सुरुवातीला 90 अंकांच्या घसरणीसोबत सुरु झाला. तर दिवसअखेर 176.43 अंकांनी घसरुन निर्देशांक 83,536.08 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 46.41 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 25,476.10 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभाग तेजीत राहिले. तर 30 मधील 17 समभाग प्रभावीत झाले आहेत. यामध्ये एचसीएल टेक, टाटा स्टील, टेक महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स हे सर्वाधिक म्हणजे 2 टक्क्यांनी घसरले आहेत.
‘या’ क्षेत्रांची कामगिरी
विविध क्षेत्रांमध्ये रियल्टी, धातू आणि तेल व गॅस यांचे क्रमश: 1.49 टक्के, 1.4 आणि 1.25 टक्क्यांची घसरण राहिली आहे.
जागतिक संकेत काय?
आशियातील बाजारात बुधवारी मिळताजुळता कल राहिला आहे. याचे कारण म्हणजे अमेरिकेकडून टॅरिफ लागू करण्याचा कालावधी आता पुन्हा पुढे ढकलण्यात येणार नसल्याने हा दबाव वाढत गेला आहे.
Home महत्वाची बातमी गुंतवणूकदार ‘टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर सावध
गुंतवणूकदार ‘टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर सावध
धातू -आयटीचा बाजारात दबाव : सेन्सेक्स 176.43 अंकांनी प्रभावीत मुंबई भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बुधवारी अमेरिकेकडून जगभरातील विविध देशांवर लागू करण्यात आलेल्या कराराच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारातील गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याचे बुधवारी दिसून आले. यामध्ये धातू आणि आयटी क्षेत्राच्या दबावाचा परिणाम भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात झाला असून यामध्ये बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी […]