साताऱ्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्चरी सराव केंद्र व्हावे! उदयनराजे यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

सातारा जिल्ह्यात आज मितीला शेकडो खेळाडू आर्चरी या खेळाचा सराव करत असून सातारा जिल्हा आर्चरी खेळातील महत्वाचे केंद्र होऊ पहात आहे. सातारा जिल्ह्यातील आर्चरी सरावाकरीता अद्यावत अश्या शासकीय केंद्राची आवश्यकता आहे. आर्चरी खेळाडुंच्या मध्ये भविष्यातील ऑलिंपिक पदके मिळवून देणेची क्षमता असल्याने, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने, याबाबत आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्चरी सराव केंद्र उभारण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी […]

साताऱ्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्चरी सराव केंद्र व्हावे! उदयनराजे यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

सातारा जिल्ह्यात आज मितीला शेकडो खेळाडू आर्चरी या खेळाचा सराव करत असून सातारा जिल्हा आर्चरी खेळातील महत्वाचे केंद्र होऊ पहात आहे. सातारा जिल्ह्यातील आर्चरी सरावाकरीता अद्यावत अश्या शासकीय केंद्राची आवश्यकता आहे. आर्चरी खेळाडुंच्या मध्ये भविष्यातील ऑलिंपिक पदके मिळवून देणेची क्षमता असल्याने, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने, याबाबत आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्चरी सराव केंद्र उभारण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज केंद्रीय क्रीडा मंत्री ना.अनुरागसिंह ठाकूर यांची समक्ष भेट घेवून केली.
दि.२० डिसेंबर २०२३ रोजी घोषीत झालेल्या अर्जुन पुरस्कारा मध्ये आर्चरी या खेळामध्ये सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केलेले कु.आदिती स्वामी व चि.ओजस देवतळे यांना घोषित झाल्याने आज केंद्रीय क्रिडा मंत्री ना.अनुरागसिंह ठाकूर यांची भेट घेवून यासंदर्भात निवेदन दिले.
निवेदन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुढे नमुद केले आहे की, सातारा जिल्हयातील कु.आदिती स्वामी, चि.ओजस देवतळे या दोघांच्या दैदिप्यमान कामगिरी बरोबरच श्री.पार्थ सुशांत साळुंखे हा यूथ वर्ल्ड चॅम्पियन झालेला पहिला भारतीय खेळाडू सुध्दा सातारा जिल्ह्यातील आहेत. या सर्वांच्या अभिनंदनीय कामगिरीवर व्यक्तीश: आम्हाला तसेच सातारा जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील समस्त नागरिकांना या खेळाडुंचा सार्थ अभिमान आहे. अश्या गुणी खेळाडुंना पायभुत सुविधा योग्य पध्दतीने मिळाल्यास, त्यांना आपला क्षमता सिध्द करण्याची संधी मिळणार असल्याने, सातारा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेसाठी सराव करण्यासाठी आधुनिक सुविधा असलेले क्रिंडागण व स्टेडियम उभारावे अशी विनंती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली.
याबरोबरच सातारा शहरातील छ. शाहु स्टेडियम येथे सिंथेटिेक ट्रॅक व कलायबिंग वॉल व पायाभुत सुविधा केंद्र शासनाचा माध्यमातुन उपलब्ध करून मिळावे अशी विंनतीसूचना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी केली.
दरम्यान, ना.अनुरागसिंह ठाकूर यांनी कु. आदिती स्वामी आणि कुमार ओजस देवताळे, या दोन अर्जुन पुरस्कारप्राप्त खेळाडुंचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचेमार्फत अभिनंदन केले असून, यासंदर्भात केंद्रशासनाच्या माध्यमातुन, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सूचनांनुसार सकारात्मकतेने योग्य कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले.