International Men’s Day 2025 Special डिनर मध्ये बनवा रेस्टॉरंट स्टाइल पनीर हराभरा पाककृती

साहित्य- पनीर – ३०० ग्रॅम ताजे हिरवे मटार – १.५ वाटी पालक – १ मोठा जुडी हिरवी मिरची – २-३ कोथिंबीर – १/२ वाटी कांदा – २ मध्यम टोमॅटो – २ मध्यम आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट – १.५ टेस्पून
International Men’s Day 2025 Special डिनर मध्ये बनवा रेस्टॉरंट स्टाइल पनीर हराभरा पाककृती

साहित्य-

पनीर – ३०० ग्रॅम  

ताजे हिरवे मटार – १.५ वाटी 

पालक – १ मोठा जुडी  

हिरवी मिरची – २-३

कोथिंबीर – १/२ वाटी

कांदा – २ मध्यम  

टोमॅटो – २ मध्यम  

आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट – १.५ टेस्पून

काजू बदाम पेस्ट – ३ टेस्पून  

फ्रेश क्रीम किंवा मलाई – ४-५ टेस्पून

बटर किंवा  तेल – २ टेस्पून

जिरे – १ टीस्पून

हळद – १/४ टीस्पून

धने-जिरे पूड – १ टीस्पून

गरम मसाला – १/२ टीस्पून

कसूरी मेथी – १ टीस्पून (भाजून कुटलेली)

मीठ, थोडी साखर 

क्रीम

कोथिंबीर

ALSO READ: डिनर मध्ये बनवा चविष्ट हिरव्या मुगाची भाजी, जाणून घ्या रेसिपी

कृती-

सर्वात आधी हिरवी प्युरी तयार करा. त्यासाठी पालक २ मिनिटे उकळत्या पाण्यात उकळून लगेच थंड पाण्यात टाका नंतर पालक, हिरवे मटार, हिरवी मिरची, कोथिंबीर एकत्र मिक्सरमध्ये बारीक प्युरी करून ठेवा. आता कढईत बटर किंवा तेल गरम करा. त्यात जिरे घाला , कांदा घाला व गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. आता आले-लसूण-मिरची पेस्ट घालून १ मिनिट परता. आता टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत (७-८ मिनिटे) चांगले परतून घ्या. आता  हळद, धने-जिरे पूड, थोडे लाल तिखट घाला. व काजू-बदाम पेस्ट घालून २ मिनिटे सतत हलवत परता. आता तयार हिरवी प्युरी घाला, चांगले मिक्स करा.गरज पडली तर १/२ वाटी पाणी घाला. ४-५ मिनिटे शिजू द्या. आता  फ्रेश क्रीम घाला, मीठ, चिमूटभर साखर, गरम मसाला, कसूरी मेथी घाला. शेवटी पनीरचे क्यूब्स हलकेच मिक्स करा. २-३ मिनिटे झाकून ठेवा. आता गॅस बंद करा, वरून १ टेस्पून क्रीम आणि कोथिंबीर घाला. तयार आहे अगदी रेस्टॉरंटसारखी हिरवीगार, क्रीमी पनीर हराभरा,  नान, बटर रोटी, किंवा जिरा राईस बरोबर नक्कीच सर्व्ह करा. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ALSO READ: डिनर करीत बनवा शाही मटर

Edited By- Dhanashri Naik

ALSO READ: डिनर स्पेशल मटर पुलाव