बेळगावात 6 मार्चला आंतरराष्ट्रीय मैदान
सिकंदर शेख-गुरुजीत मागरोड पंजाब त्यांच्यात प्रमुख लढत
बेळगाव : बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटना आयोजित भव्य निकाली कुस्तीचे आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान बुधवार दि. 6 मार्च रोजी आनंदवाडीच्या आखाड्यात आयोजित करण्यात आली आहे. या कुस्ती मैदानात भारत-इराण यांच्यातून प्रमुख लढती होणार आहेत. या कुस्ती मैदानात प्रमुख कुस्ती संपुर्ण भारतात धुमाकूळ घालणाऱ्या महाराष्ट्राचा अस्सल मल्ल सिकंदर शेख कोल्हापूर वि. भारत केसरी गुरुजीत मागरोड पंजाब यांच्यात बेळगाव केसरी किताबाच्या लढतीसाठी प्रमुख लढत होणार आहे. ही कुस्ती बेळगावचे पालकमंत्री सतीश जारर्काहोळी यांचे सुपुत्र राहुल जारर्काहोळी यांनी पुरस्कृत केली आहे. दुसऱ्या क्रमांकाची लढत बेळगाव मल्ल सम्राट केसरी किताबासाठी माऊली कोकाटे पुणे व महदी इराण यांच्यात लढत होणार आहे. ही कुस्ती जय भारत फौउंडेशन यांनी पुरस्कृत केली आहे. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती दर्शन केसरी किताबासाठी महाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर विरुद्ध हादी इराण यांच्यात होणार आहे. ही कुस्ती दर्शनचे संचालक श्रीकांत देसाई व दर्शन देसाई यानी पुरस्कृत केली आहे. चौथ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटकाचा वाघ कार्तिक काटे विरुद्ध काका पवार यांचा पट्टा जयदिप पुणे यांच्यात होणार आहे. या मैदानाचे खास आकर्षण म्हणजे कुस्तीचा युट्युबचा जादूगार म्हणून ओळखला जाणारा देवा थापा नेपाळ यांची ही कुस्ती प्रथमच बेळगावच्या या मैदानात घेतली आहे. त्याशिवाय लहान मोठ्या 70 हून अधिक कुस्तीचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष सुधीर बिर्जे यांनी कळविले आहे.
Home महत्वाची बातमी बेळगावात 6 मार्चला आंतरराष्ट्रीय मैदान
बेळगावात 6 मार्चला आंतरराष्ट्रीय मैदान
सिकंदर शेख-गुरुजीत मागरोड पंजाब त्यांच्यात प्रमुख लढत बेळगाव : बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटना आयोजित भव्य निकाली कुस्तीचे आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान बुधवार दि. 6 मार्च रोजी आनंदवाडीच्या आखाड्यात आयोजित करण्यात आली आहे. या कुस्ती मैदानात भारत-इराण यांच्यातून प्रमुख लढती होणार आहेत. या कुस्ती मैदानात प्रमुख कुस्ती संपुर्ण भारतात धुमाकूळ घालणाऱ्या महाराष्ट्राचा अस्सल मल्ल सिकंदर शेख कोल्हापूर […]