इंटरनॅशनल डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग आता कोल्हापूरात

– ‘प्राईम फॅशन इन्स्टिट्यूट’च्यावतीने कोर्स सुरु ► प्रतिनिधी कोल्हापूर ‘इंटरनॅशनल डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग’ कोर्स आता कोल्हापूर येथील प्राईम फॅशन इन्स्टिट्यूट मध्ये सुरु झाला आहे. एक वर्षाच्या इंटरनॅशनल फॅशन डिझायनिंग डिप्लोमा कोर्स दुबईचे इंटरनॅशनल सर्टिफिकेशन आता कोल्हापूरमध्ये मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ही पहिलीच इन्स्टिट्यूट आहे. दुबईमध्ये ‘प्राईम इझी लर्न ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ चालवत असलेल्या मेहेक कक्कर […]

इंटरनॅशनल डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग आता कोल्हापूरात

– ‘प्राईम फॅशन इन्स्टिट्यूट’च्यावतीने कोर्स सुरु
► प्रतिनिधी
कोल्हापूर
‘इंटरनॅशनल डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग’ कोर्स आता कोल्हापूर येथील प्राईम फॅशन इन्स्टिट्यूट मध्ये सुरु झाला आहे. एक वर्षाच्या इंटरनॅशनल फॅशन डिझायनिंग डिप्लोमा कोर्स दुबईचे इंटरनॅशनल सर्टिफिकेशन आता कोल्हापूरमध्ये मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ही पहिलीच इन्स्टिट्यूट आहे. दुबईमध्ये ‘प्राईम इझी लर्न ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ चालवत असलेल्या मेहेक कक्कर यांनी आपल्या पंधरा वर्षाच्या अनुभवानंतर कोल्हापुरात आपल्या जन्मगावी येथील मुलांना ही संधी उपलब्ध करून दिली आहे.
सध्या ‘फॅशन वर्ल्ड’चा वाढता प्रभाव पाहून आपल्या नवीन पिढीला ही सुंदर संधी आता कोल्हापुरातच मिळणार आहे. प्राईम फॅशन इन्स्टिट्यूट मध्ये सर्व आधुनिक मशिनरीज, कम्प्युटर लॅब्स, क्लास रूम्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आपल्या करिअरला योग्य दिशा देण्यासाठी इच्छूकांनी इन्स्टिट्यूटला भेट देवून माहिती घ्यावी असे आवाहन मेहेक कक्कर यांनी केले आहे. सदर इन्स्टिट्यूटमध्ये 1 वर्षाचे आंतरराष्ट्रीय डिप्लोमा प्रमाणपत्र, 100 टक्के दुबई आणि भारतात नोकरीसाठी सहाय्य आणि मार्गदर्शन, चार दिवसांची दुबई एज्युकेशनल ट्रिप व फॅशन शो, फॅशन इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय सेटअप करण्यासाठी मार्गदर्शन, डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर लाईफ टाईम सपोर्ट, डिप्लोमा सुरु असताना विद्यार्थ्यांना स्वत:चा व्यावसायिक उत्पन्न मिळवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.