ओरोस सहाय्यक पो.निरीक्षक मनीष कोल्हटकर यांचा सत्कार
पोलीस स्थापना दिनाचे औचित्य
कसाल/ वार्ताहर
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने ओरोस पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन परब ज्ञाती बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भेटी दरम्यान सुशील परब म्हणाले पोलीस प्रशासनात आपल्या कुटुंबातील व्यक्ती नोकरीला लागतो त्यावेळेस त्याला कोणतेही सण -साजरे करता येत नाही. तो पहिले जनता जनार्दनांचा सेवक असतो .अहोरात्र मेहनत घेऊन जनतेची सेवा त्यांनी स्वीकारलेली असते. त्यानंतर आपल्या कुटुंबाकडे त्यांना लक्ष देता येते. जनतेची सेवा करत असताना त्यांना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागते यामध्ये रस्त्यावरील अपघात असो किंवा इतर कोणत्याही प्रसंग असो ही सेवा पोलीस अधिकारी, कर्मचारी अहोरात्र करतात. आज महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने पोलीस बांधव आजही सेवा बजावत आहेत. आपल्या मित्र परिवाराचे भाग्य आहे की आपण आज त्यांच्या कामाची पोच पावती म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहोत. यावेळी सिंधुदुर्गनगरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर तसेच पोलीस उपनिरीक्षक नितीन कदम व सर्व पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सिंधुदुर्ग परब मराठा समाज ज्ञाती बांधवांच्या वतीने सा.पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर यांचा सत्कार करताना जे बी परब, सुशील परब, शुभम परब, परशुराम परब, विनोद परब, महादेव परब, मारुती परब ,आदी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी ओरोस सहाय्यक पो.निरीक्षक मनीष कोल्हटकर यांचा सत्कार
ओरोस सहाय्यक पो.निरीक्षक मनीष कोल्हटकर यांचा सत्कार
पोलीस स्थापना दिनाचे औचित्य कसाल/ वार्ताहर महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने ओरोस पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन परब ज्ञाती बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भेटी दरम्यान सुशील परब म्हणाले पोलीस प्रशासनात आपल्या कुटुंबातील व्यक्ती नोकरीला लागतो त्यावेळेस त्याला कोणतेही सण -साजरे करता येत नाही. तो पहिले […]