सदाशिवनगरातील नाल्याची आमदार राजू सेठ यांच्याकडून पाहणी
प्रतिनिधी / बेळगाव
मागील आठवड्यात झालेल्या वळिवाच्या पावसामुळे सदाशिवनगर शेवटचा क्रॉस येथे नाल्याचे पाणी ओव्हरफ्लो होऊन घरांमध्ये शिरले होते. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. स्थानिक आमदार राजू सेठ यांनी रविवारी या परिसराला भेट देऊन समस्या जाणून घेतली. तसेच नाला बांधकामाबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
नागरिकांनी महानगरपालिकेकडे तक्रार करून देखील अधिकाऱ्यांनी केवळ पाहणी करण्याव्यतिरिक्त कोणतीही कार्यवाही केली नाही. नाल्याचे व्यवस्थित बांधकाम नसल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात नाला ओव्हरफ्लो होऊन आसपासच्या घरांमध्ये कचरा व सांडपाणी शिरत आहे. याची तक्रार आमदार राजू सेठ यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांनी या तक्रारीची दखल घेत पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी प्रसाद चौगुले, जमील देसाई, गणपती कर्की, केदार देसूरकर, सागर शिंदे यासह इतर सदस्य उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी सदाशिवनगरातील नाल्याची आमदार राजू सेठ यांच्याकडून पाहणी
सदाशिवनगरातील नाल्याची आमदार राजू सेठ यांच्याकडून पाहणी
प्रतिनिधी / बेळगाव मागील आठवड्यात झालेल्या वळिवाच्या पावसामुळे सदाशिवनगर शेवटचा क्रॉस येथे नाल्याचे पाणी ओव्हरफ्लो होऊन घरांमध्ये शिरले होते. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. स्थानिक आमदार राजू सेठ यांनी रविवारी या परिसराला भेट देऊन समस्या जाणून घेतली. तसेच नाला बांधकामाबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. नागरिकांनी महानगरपालिकेकडे तक्रार करून देखील अधिकाऱ्यांनी केवळ पाहणी करण्याव्यतिरिक्त कोणतीही कार्यवाही केली […]
