तहसीलदार गायकवाड यांच्याकडून असोगा, सातनाळी, माचाळी पुलांची पाहणी
सतर्क राहण्याच्या सूचना
खानापूर : खानापूर तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या चार आठवड्यात तालुक्यातील सातनाळी, माथाडी, मणतुर्गा यासह इतर ठिकाणी रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. संततधार सुरू असलेल्या पावसामुळे तहसीलदार प्रकाश गायकवाड, हेस्कॉमच्या कल्पना तिरवीर, महसूल विभागाचे अधिकारी तुऊकगोड यांनी लोंढा, मांजरपै या ठिकाण असलेल्या पुलांची पाहणी केली. तसेच संततधार सुरू असलेल्या पावसामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना महसूल अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
तसेच विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी योग्य ते नियोजन करण्यात यावे, अशी सूचनाही हेस्कॉमच्या कल्पना तिरवीर यांनाही सूचना करण्यात आली आहे. या सर्व पुलांच्या पाहणी दौऱ्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी ‘तऊण भारत’शी बोलताना सांगितले. आवश्यक असलेल्या ठिकाणी पुलांची उंची वाढवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याला आराखडे तयार करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्याचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी सांगितले.
Home महत्वाची बातमी तहसीलदार गायकवाड यांच्याकडून असोगा, सातनाळी, माचाळी पुलांची पाहणी
तहसीलदार गायकवाड यांच्याकडून असोगा, सातनाळी, माचाळी पुलांची पाहणी
सतर्क राहण्याच्या सूचना खानापूर : खानापूर तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या चार आठवड्यात तालुक्यातील सातनाळी, माथाडी, मणतुर्गा यासह इतर ठिकाणी रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. संततधार सुरू असलेल्या पावसामुळे तहसीलदार प्रकाश गायकवाड, हेस्कॉमच्या कल्पना तिरवीर, महसूल विभागाचे अधिकारी तुऊकगोड यांनी लोंढा, मांजरपै […]
