विमानतळ विकासकामांची अधिकाऱ्यांकडून पाहणी
प्रवासी संख्या वाढत असल्याने विस्तारीकरणाचे काम : बोईंग विमानांची संख्या वाढण्याची शक्यता
बेळगाव : एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बेळगाव विमानतळाची पाहणी केली. मुख्य धावपट्टीसह आजूबाजूच्या परिसरात सुरू असणाऱ्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. विमानाच्या टेक्ऑफ व लँडिंगवेळी कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ नयेत, यासाठीची पाहणी करण्यात आली. बेळगाव विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. याबरोबरच सुसज्ज टर्मिनल बिल्डिंग व इतर विकासकामे केली जाणार आहेत. प्रवाशांची संख्या वाढत असल्याने बोईंग विमानांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने धावपट्टी सक्षम असणे गरजेचे आहे. सध्या मुख्य धावपट्टीवर स्वच्छता व रंगरंगोटी केली जात आहे. बऱ्याच वेळा ढगाळ वातावरणामुळे विमान लँडिंग करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. मुख्य धावपट्टी वैमानिकाला दिसून येत नाही. त्यासाठी रंगकाम सुरू केले आहे. बेळगाव विमानतळ प्राधिकरणाचे संचालक त्यागराजन यांच्यासोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली. विमानतळाच्या बाजूने केलेल्या रस्त्याचीही अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
Home महत्वाची बातमी विमानतळ विकासकामांची अधिकाऱ्यांकडून पाहणी
विमानतळ विकासकामांची अधिकाऱ्यांकडून पाहणी
प्रवासी संख्या वाढत असल्याने विस्तारीकरणाचे काम : बोईंग विमानांची संख्या वाढण्याची शक्यता बेळगाव : एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बेळगाव विमानतळाची पाहणी केली. मुख्य धावपट्टीसह आजूबाजूच्या परिसरात सुरू असणाऱ्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. विमानाच्या टेक्ऑफ व लँडिंगवेळी कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ नयेत, यासाठीची पाहणी करण्यात आली. बेळगाव विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. याबरोबरच सुसज्ज […]