शहरातील प्रमुख शिवमंदिरांमध्ये श्वानपथकासह तपासणी मोहीम

बेळगाव : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व उपनगरातील सर्व शिवमंदिरात धार्मिक कार्यक्रमांची तयारी पूर्ण झाली आहे. पोलीस दलानेही मंदिर परिसरात बंदोबस्त वाढवला असून गुरुवारी काही प्रमुख मंदिरात स्फोटक तज्ञांकडून तपासणी करण्यात आली. बेंगळूर येथील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटानंतर सर्वत्र खबरदारी घेण्यात आली. प्रमुख ठिकाणी स्फोटके शोधणारे श्वान व मेटल डिटेक्टरच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे. […]

शहरातील प्रमुख शिवमंदिरांमध्ये श्वानपथकासह तपासणी मोहीम

बेळगाव : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व उपनगरातील सर्व शिवमंदिरात धार्मिक कार्यक्रमांची तयारी पूर्ण झाली आहे. पोलीस दलानेही मंदिर परिसरात बंदोबस्त वाढवला असून गुरुवारी काही प्रमुख मंदिरात स्फोटक तज्ञांकडून तपासणी करण्यात आली. बेंगळूर येथील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटानंतर सर्वत्र खबरदारी घेण्यात आली. प्रमुख ठिकाणी स्फोटके शोधणारे श्वान व मेटल डिटेक्टरच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे. गुरुवारी कपिलेश्वर मंदिरासह बेळगाव परिसरातील अनेक मंदिरात खबरदारी म्हणून तपासणी करण्यात आली आहे. महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी शिवमंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. ही गोष्ट लक्षात घेऊन पोलीस दलाच्यावतीने तपासणी करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्याशी संपर्क साधला असता ही एक नियमित तपासणी असल्याचे त्यांनी सांगितले. बेंगळूर येथील घटनेनंतर गर्दीच्या ठिकाणी तपासणी वाढवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.