बहुग्राम पाणीपुरवठा योजनांची पाहणी करा

जि. पं. सीईओ शिंदे यांची सूचना : बेळगाव-चिकोडी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बेळगाव : बहुग्राम पाणीपुरवठा योजनांची आर्थिक व भौतिक परिस्थितीची पाहणी करण्यात यावी. या योजनेंतर्गत पाणीपुरवठा करणाऱ्या गावांना पाण्याची कमतरता भासू नये यादृष्टिने कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचना जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केली. येथील जिल्हा पंचायत कार्यालयामध्ये गुरुवारी बेळगाव आणि चिकोडी […]

बहुग्राम पाणीपुरवठा योजनांची पाहणी करा

जि. पं. सीईओ शिंदे यांची सूचना : बेळगाव-चिकोडी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक
बेळगाव : बहुग्राम पाणीपुरवठा योजनांची आर्थिक व भौतिक परिस्थितीची पाहणी करण्यात यावी. या योजनेंतर्गत पाणीपुरवठा करणाऱ्या गावांना पाण्याची कमतरता भासू नये यादृष्टिने कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचना जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केली. येथील जिल्हा पंचायत कार्यालयामध्ये गुरुवारी बेळगाव आणि चिकोडी विभागातील ग्रामीण पिण्याचे पाणी आणि स्वच्छता खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. बहुग्राम पाणीपुरवठा योजनेंतर्गत पिण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा दर्जा तपासण्यात यावा, गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या जलकुंभांची ग्राम पंचायतेंनी महिन्यातून एकदा स्वच्छता करावी, साहाय्यक कार्यकारी अभियंत्यांनी याची जबाबदारी घेऊन योग्यप्रकारे पाणीपुरवठा करावा, अशी सूचना त्यांनी केली.  जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेली कामे त्वरित पूर्ण करून ग्राम पंचायतींकडे हस्तांतर करण्यात यावे. प्रत्येक अधिकाऱ्याने स्वत:हून ग्राम पंचायतींना भेट देऊन पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करावी, अशी सूचना केली. यावेळी जिल्हा पंचायत योजना संचालक डॉ. एम. कृष्णराजू, आरडीडब्ल्युएस बेळगाव विभागाचे कार्यकारी अभियंता शशिकांत नाईक, चिकोडी विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग राव, तालुका कार्यकारी अभियंता, कंत्राटदार आदी उपस्थित होते.