‘आयएनएस संध्याक’ नौदलाच्या ताफ्यात

पाळत ठेवणारी युद्धनौका : 11 हजार किलोमीटरची रेंज; बोफोर्स तोफांसह चेतक हेलिकॉप्टरने सुसज्ज वृत्तसंस्था /विशाखापट्टणम ‘आयएनएस संध्याक’ शनिवारी नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आले. ही युद्धनौका समुद्रातील धोक्मयांशी लढण्यात माहिर आहे. या युद्धतौकेच्या माध्यमातून भारतीय नौदलाला स्वदेशी ‘शार्क’ मिळाला असून तो क्षणार्धात समुद्रातील धोक्मयांचा सामना करू शकतो, असा दावा केला जात आहे. या जहाजावर बोफोर्स तोफा […]

‘आयएनएस संध्याक’ नौदलाच्या ताफ्यात

पाळत ठेवणारी युद्धनौका : 11 हजार किलोमीटरची रेंज; बोफोर्स तोफांसह चेतक हेलिकॉप्टरने सुसज्ज
वृत्तसंस्था /विशाखापट्टणम
‘आयएनएस संध्याक’ शनिवारी नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आले. ही युद्धनौका समुद्रातील धोक्मयांशी लढण्यात माहिर आहे. या युद्धतौकेच्या माध्यमातून भारतीय नौदलाला स्वदेशी ‘शार्क’ मिळाला असून तो क्षणार्धात समुद्रातील धोक्मयांचा सामना करू शकतो, असा दावा केला जात आहे. या जहाजावर बोफोर्स तोफा बसवण्यात आल्या आहेत. तसेच ते चेतक हेलिकॉप्टरने सुसज्ज आहे. ‘आयएनएस संध्याक’च्या जलावतरण सोहळ्याला संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि नौदलप्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार उपस्थित होते. याप्रसंगी संरक्षणमंत्र्यांनी या युद्धनौकेची आणि भारतीय आरमाराची महती अधोरेखीत केली. नवनव्या युद्धसामग्रींमुळे भारतीय नौदल इतके मजबूत झाले आहे. आम्ही हिंदी महासागर आणि पॅसिफिक क्षेत्रात सुरक्षेच्या बाबतीत सर्वोच्च ठरलो आहोत, असे राजनाथ सिंग म्हणाले. ‘आयएनएस संध्याक’ सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खूप खास आहे. सागरी नेव्हिगेशन सुलभ करणे हे त्याचे कार्य आहे.
समुद्राच्या खोलीवर लक्ष ठेवता येईल. दोन डिझेल इंजिनवर चालणाऱ्या ‘संध्याक’मध्ये 18 अधिकारी आणि 160 सैनिक तैनात केले जाऊ शकतात. 288 फूट लांब सर्वेक्षण जहाजाचे वजन 3,400 टन आहे. भारतीय नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी विशाखापट्टणम येथील नौदल डॉकयार्ड येथे ‘आयएनएस संध्याक’च्या राष्ट्रार्पण समारंभाला संबोधित केले. या युद्धनौकेच्या माध्यमातून समुद्रातील विविध प्रकारच्या कारवाया आणि कामे करणे सोपे जाईल, असे ते म्हणाले. नौदलाने गेल्या दशकात स्वदेशी आणि अत्याधुनिक प्लॅटफॉर्मच्या मोठ्या श्रेणीचे लॉन्चिंग हाती घेतले आहे. शक्तिशाली विमानवाहू युद्धनौका विक्रांत असो, विशाखापट्टणम क्लासचे घातक विनाशक असो, विशाल क्लासचे फ्रिगेट्स असो, कलवरी क्लासच्या पाणबुड्या असोत किंवा स्पेशल डायव्हिंग सपोर्ट शिप असोत, या सर्वांच्या माध्यमातून नौदलाची ताकद वाढल्याचे त्यांनी नमूद केले. उदयोन्मुख भारताच्या सेवेसाठी आम्ही काळजीपूर्वक संतुलित आणि आत्मनिर्भर शक्ती तयार करत आहोत, असेही ते म्हणाले.