शिंदे शिवसेनेकडून उद्या होणार उमेदवारी अर्ज दाखल

आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उच्चशिक्षित : आ . केसरकर सावंतवाडी प्रतिनिधी राज्य निवडणूक निर्णय अधिकारी यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशीही उमेदवारी अर्ज भरण्यास मुभा दिली असून आता उमेदवारी अर्ज भरण्यास आणखीन दोन दिवस मिळणार आहेत. त्यामुळे 17 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असला तरी उद्या रविवारी 16 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज भरता येणार आहे . सावंतवाडीत […]

शिंदे शिवसेनेकडून उद्या होणार उमेदवारी अर्ज दाखल

आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उच्चशिक्षित : आ . केसरकर
सावंतवाडी प्रतिनिधी
राज्य निवडणूक निर्णय अधिकारी यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशीही उमेदवारी अर्ज भरण्यास मुभा दिली असून आता उमेदवारी अर्ज भरण्यास आणखीन दोन दिवस मिळणार आहेत. त्यामुळे 17 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असला तरी उद्या रविवारी 16 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज भरता येणार आहे . सावंतवाडीत महायुतीमध्ये सध्या धुसफूस सुरु असून या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे पक्षाचा थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित झाला असून दहा प्रभागांमध्ये वीस उमेदवारांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आज शनिवारी सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज भरले जाणार होते. मात्र आता शिंदे शिवसेनेने रविवार 16 नोव्हेंबरचा मुहूर्त काढला असून उद्या जल्लोषी वातावरणात उमेदवारी अर्ज भरणार आहोत अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी यावेळी दिली. महायुतीशी आमचे बोलणे सुरू आहे. परंतु, आम्ही इच्छुक कार्यकर्त्यांच्या एकंदरीत परिस्थितीनुसार तोपर्यंतउमेदवारी अर्ज भरत आहोत. आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे उच्चशिक्षित आहेत असे ते म्हणाले. श्री केसरकर यांच्या श्रीधर अपार्टमेंटमध्ये आज इच्छुक उमेदवार कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.