पंतप्रधान मोदींमुळे उद्योग क्षेत्राची भरभराट
जगदीश शेट्टर यांनी बेळगावच्या उद्योजकांशी साधला संवाद
बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात उद्योग क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. उद्योग क्षेत्राविषयी त्यांची दूरदृष्टी असल्याने आज परदेशांमधील मोठे उद्योग भारतात येत आहेत. उद्योजकांसाठी अनेक योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्राची भरभराट सुरू असून यापुढेही प्रगती सुरू ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी भाजपच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहावे, असे आवाहन बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी केले. गुऊवारी सायंकाळी उद्यमबाग येथे झालेल्या बैठकीत त्यांनी उद्योजकांशी संवाद साधला. मुख्यमंत्रिपदी असताना बेळगावच्या औद्योगिक क्षेत्रासाठी राबविलेल्या योजनांची त्यांनी माहिती दिली. खासदार होण्याची संधी दिल्यास उद्योजकांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. उद्योजकांनी आपला पाठिंबा जगदीश शेट्टर यांना जाहीर केला. यावेळी सचिन सबनीस, राम भंडारे, आनंद देसाई, श्रीधर उप्पीन, रोहन जुवळी यासह बेळगावमधील उद्योजक उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी पंतप्रधान मोदींमुळे उद्योग क्षेत्राची भरभराट
पंतप्रधान मोदींमुळे उद्योग क्षेत्राची भरभराट
जगदीश शेट्टर यांनी बेळगावच्या उद्योजकांशी साधला संवाद बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात उद्योग क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. उद्योग क्षेत्राविषयी त्यांची दूरदृष्टी असल्याने आज परदेशांमधील मोठे उद्योग भारतात येत आहेत. उद्योजकांसाठी अनेक योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्राची भरभराट सुरू असून यापुढेही प्रगती सुरू ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना […]