रोटरी ई क्लबचा पदग्रहण सोहळा

रो. लक्ष्मी मुतालिक यांची अध्यक्षपदी निवड बेळगाव : रोटरी ई क्लबचा पदग्रहण सोहळा गोगटे कॉलेजच्या वेणूगोपाल सभागृहात नुकताच पार पडला. रो. लक्ष्मी मुतालिक यांची 2024-25 सालासाठी रोटरी ई क्लबच्या अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. व्यासपीठावर रोटरीचे माजी प्रांतपाल रो. अविनाश पोतदार, माजी अध्यक्ष  ज्योती मठद, माजी सचिव आशुतोष डेव्हिड, नवनिर्वाचित अध्यक्षा लक्ष्मी मुतालिक, सचिव सागर वाघमारे, प्रांतापालांचे साहाय्यक वकील. सचिन […]

रोटरी ई क्लबचा पदग्रहण सोहळा

रो. लक्ष्मी मुतालिक यांची अध्यक्षपदी निवड
बेळगाव : रोटरी ई क्लबचा पदग्रहण सोहळा गोगटे कॉलेजच्या वेणूगोपाल सभागृहात नुकताच पार पडला. रो. लक्ष्मी मुतालिक यांची 2024-25 सालासाठी रोटरी ई क्लबच्या अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. व्यासपीठावर रोटरीचे माजी प्रांतपाल रो. अविनाश पोतदार, माजी अध्यक्ष  ज्योती मठद, माजी सचिव आशुतोष डेव्हिड, नवनिर्वाचित अध्यक्षा लक्ष्मी मुतालिक, सचिव सागर वाघमारे, प्रांतापालांचे साहाय्यक वकील. सचिन बिच्चू व कार्यक्रमाच्या व्यवस्थापक डॉ. राजश्री कुलकर्णी उपस्थित होत्या.
आशुतोष डेव्हिड यांच्या प्रकल्पांचे सादरीकरण
यावेळी आशुतोष डेव्हिड यांनी वर्षभरात केलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले.  ज्योती मठद यांनी 5 गरीब मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती जाहीर केली. मरिअम्मा टीचर संचालित किआन, नंदन मक्कळ धाम, कऊणालय होम फॉर डेस्टिट्यूट्स यांना प्रत्येकी 15 किलो तेलाचा डबा आणि 5 किलो शेंगदाणे देण्यात आले. तेल आणि शेंगदाणे खेडूत फूड्स आणि फीड्स, गोंदल, गुजरातचे एमडी तुषार थुम्मर यांनी प्रायोजित केले होते.
नवीन कार्यकारिणीची नावे जाहीर
त्यानंतर माजी प्रांतपाल गव्हर्नर अविनाश पोतदार यांच्या हस्ते लक्ष्मी मुतालिक यांना अध्यक्षपदाची सुत्रे देण्यात आली. लक्ष्मी मुतालिक यांनी आपल्या नवीन कार्यकारिणी सदस्यांची नावे जाहीर केली. अविनाश पोतदार यांनी भाषणात क्लबने केलेल्या प्रकल्पांचे कौतुक करून, क्लबने आजपर्यंत उभारलेल्या निधीबद्दल अभिनंदन केले. सूत्रसंचालन लता कित्तूर यांनी केले. डॉ. राजश्री यांनी आभार मानले.