इंडोनेशिया, जपानची आगेकूच, द. कोरियाची ऑलिम्पिक संधी हुकली
वृत्तसंस्था/ दोहा
1984 नंतर प्रथमच दक्षिण कोरिया फुटबॉल संघाला ऑलिम्पिक स्पर्धा हुकणार आहे. येथे झालेल्या यू-23 आशियाई चषक उपांत्यपूर्व लढतीत द.कोरियाला इंडोनेशियाकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये 11-10 असा धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. अन्य एका सामन्यात जपानने कतारचा 4-2 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
निर्धारित वेळेत इंडोनेशिया व द.कोरिया यांच्यात 2-2 अशी बरोबरी झाली होती. या स्पर्धेतील पहिल्या तीन संघांना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळणार आहे. त्यानुसार इंडोनेशियाने शेवटच्या चार संघांत स्थान मिळविले आहे. पण त्यांना टॉप तीनमध्येच स्थान मिळवावे लागणार आहे. राफाएल स्ट्रुइकने 15 व्या मिनिटाला इंडोनेशियाचा पहिला गोल केला. पण 45 व्या मिनिटाला इंडोनेशियाच्या कोमांग तेगुहने स्वयंगोल केल्याने द.कोरियाला 1-1 अशी बरोबरी साधता आली. पूर्वार्धातील जादा वेळेत स्ट्रुइकनेच वैयक्तिक व संघाचा दुसरा गोल करून इंडोनेशियाला पुन्हा आघाडीवर नेले. पण सामना संपण्यास 14 मिनिटे असताना जेआँग सँग-बिनने गोल करून कोरियाला पुन्हा एकदा बरोबरी साधून दिली. काही मिनिटे आधीच कोरियाच्या ली युंग जुनला रेड कार्ड मिळाल्याने कोरियाला दहा खेळाडूंनिशी खेळावे लागले. शूटआऊटमध्ये 11-10 अशी स्थिती असताना कोरियाला बरोबरी साधण्याची संधी होती. पण ली कांग ही याची पेनल्टी हुकली आणि कोरियाला पराभव स्वीकारावा लागला.
तत्पूर्वी झालेल्या सामन्यात जपानने यजमान कतारचा जादा वेळेत 4-2 असा पराभव केला आणि सलग आठव्यांदा ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची आशा निर्माण केली आहे.
Home महत्वाची बातमी इंडोनेशिया, जपानची आगेकूच, द. कोरियाची ऑलिम्पिक संधी हुकली
इंडोनेशिया, जपानची आगेकूच, द. कोरियाची ऑलिम्पिक संधी हुकली
वृत्तसंस्था/ दोहा 1984 नंतर प्रथमच दक्षिण कोरिया फुटबॉल संघाला ऑलिम्पिक स्पर्धा हुकणार आहे. येथे झालेल्या यू-23 आशियाई चषक उपांत्यपूर्व लढतीत द.कोरियाला इंडोनेशियाकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये 11-10 असा धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. अन्य एका सामन्यात जपानने कतारचा 4-2 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. निर्धारित वेळेत इंडोनेशिया व द.कोरिया यांच्यात 2-2 अशी बरोबरी झाली होती. या स्पर्धेतील […]