इंडिगोचा नफा दुप्पट, उलाढालीत 26 टक्के वाढ!
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंडिगोची ऑपरेटिंग कंपनी, इंटरग्लोबल एव्हिएशनने आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत एकूण 1,894.82 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.
गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत 919.20 कोटी रुपयांच्या नफ्यापेक्षा हा नफा 106 टक्के जास्त आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, गेल्या वर्षीच्या तुलनेत या तिमाहीत इंडिगोचा नफा दुपटीने वाढला आहे.
इंडिगोने तिच्या महसुलात 25.88 टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवली आहे. या तिमाहीत कंपनीचा महसूल 17,825.27 कोटी रुपये होता, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत 14,160.60 कोटी राहिल्याची माहिती आहे. इंडिगोने यावर्षी व्यस्त हवाई मार्गांवर बिझनेस क्लास सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने शेअर बाजाराला कळवले आहे की, बिझनेस क्लासशी संबंधित सर्व माहिती, उद्घाटनाची तारीख आणि कोणत्या मार्गांवर सेवा उपलब्ध असेल, याची घोषणा ऑगस्टमध्ये कंपनीच्या 18 व्या वर्धापन दिनाच्या आसपास करण्यात येणार आहे.
इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स म्हणाले, ‘आमचा विश्वास आहे की भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, व्यावसायिक प्रवासी देखील वाढत आहेत. वाढत्या प्रवाशांच्या गरजांचा विचार करुन कंपनी आगामी काळात जास्तीत जास्त सेवा देण्यासाठी अग्रक्रमावर राहणार आहे’ कंपनीच्या तिमाही कमाईच्या अहवालापूर्वी इंडिगोचे शेअर्स 4,414.90 वर बंद झाले होते.
Home महत्वाची बातमी इंडिगोचा नफा दुप्पट, उलाढालीत 26 टक्के वाढ!
इंडिगोचा नफा दुप्पट, उलाढालीत 26 टक्के वाढ!
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली इंडिगोची ऑपरेटिंग कंपनी, इंटरग्लोबल एव्हिएशनने आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत एकूण 1,894.82 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत 919.20 कोटी रुपयांच्या नफ्यापेक्षा हा नफा 106 टक्के जास्त आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, गेल्या वर्षीच्या तुलनेत या तिमाहीत इंडिगोचा नफा दुपटीने वाढला आहे. इंडिगोने तिच्या महसुलात 25.88 टक्क्यांची वार्षिक […]