भारतातील स्टील मागणी वाढणार
आगामी काही वर्षांमध्ये 10 टक्के दराने राहणार वाढ : पोलाद सचिव नागेंद्र नाथसिन्हा यांची माहिती
नवी दिल्ली :
सरकारने पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे पुढील काही वर्षांत देशांतर्गत स्टीलची मागणी 10 टक्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रीय राजधानीत ‘सीआयआय कॉन्फरन्स ऑन फ्यूचर रेडी अँड ग्रीन मॅन्युफॅक्चरिंग’ ला संबोधित करताना पोलाद सचिव नागेंद्र नाथ सिन्हा यांनी बुधवारी या संदर्भात माहिती दिली आहे.
पायाभूत सुविधांवर सरकारने लक्ष केंद्रित केल्याने देशांतर्गत स्टीलची मागणी दुहेरी आकड्यांमध्ये वाढेल, असे ते म्हणाले. 2023-24 या आर्थिक वर्षात वार्षिक आधारावर मागणी 13-14 टक्क्यांनी वाढली आहे. भविष्यात त्यात 10 टक्के वाढ होत राहील. अधिकृत आकडेवारीनुसार, 2023-24 या आर्थिक वर्षात क्रूड स्टीलचे उत्पादन सुमारे 145 दशलक्ष टन होते जे याआधीच्या वर्षात म्हणजेच 2022-23 या आर्थिक वर्षात 127 दशलक्ष टन होते. 2023-24 आर्थिक वर्षात 136 दशलक्ष टन वापर झाला, तर 2022-23 मध्ये तो 120 दशलक्ष टन वापर झाला होता असेही सिन्हा यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
Home महत्वाची बातमी भारतातील स्टील मागणी वाढणार
भारतातील स्टील मागणी वाढणार
आगामी काही वर्षांमध्ये 10 टक्के दराने राहणार वाढ : पोलाद सचिव नागेंद्र नाथसिन्हा यांची माहिती नवी दिल्ली : सरकारने पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे पुढील काही वर्षांत देशांतर्गत स्टीलची मागणी 10 टक्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रीय राजधानीत ‘सीआयआय कॉन्फरन्स ऑन फ्यूचर रेडी अँड ग्रीन मॅन्युफॅक्चरिंग’ ला संबोधित करताना पोलाद सचिव नागेंद्र नाथ सिन्हा यांनी बुधवारी […]