टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी यांच्या टाचेवर शस्त्रक्रिया यशस्वी

टीम इंडियाचा स्टार आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्यावर टाचेवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली आहे. मोहम्मद शमीने शस्त्रक्रियेनंतर सोशल मीडियावर फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.”मी यातून रिकव्हर होत आहे. यातून पूर्णपणे बरा होण्यासाठी वेळ लागेल. मात्र मी पुन्हा कमबॅक करेन”, असा विश्वास शमीने या पोस्टमधून व्यक्त केला आहे.मोहम्मद शमीला आयसीसी वनडे वर्ल्ड कप […]

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी यांच्या टाचेवर शस्त्रक्रिया यशस्वी

टीम इंडियाचा स्टार आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्यावर टाचेवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली आहे. मोहम्मद शमीने शस्त्रक्रियेनंतर सोशल मीडियावर फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.”मी यातून रिकव्हर होत आहे. यातून पूर्णपणे बरा होण्यासाठी वेळ लागेल. मात्र मी पुन्हा कमबॅक करेन”, असा विश्वास शमीने या पोस्टमधून व्यक्त केला आहे.मोहम्मद शमीला आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 फायनल सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. मात्र शमी त्याच दुखापतीसह टीम इंडियासाठी खेळला. त्यानंतर तो एकही सामन्यात खेळला नाही. शमीने सोशल मीडियावर शस्त्रक्रियेनंतर काही फोटो शेअर केले आहेत. शमीला कायम मैदानात जल्लोष करतानाचे फोटो पाहण्याची क्रिकेट चाहत्यांना सवय आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या खेळाडूला अशा अवस्थेत क्रिकेट चाहच्यांना पाहवत नाहीये.दरम्यान मोहम्मद शमी याला या शस्त्रक्रियेमुळे आगामी आयपीएलच्या 17 व्या मोसमातून खेळता येणार नसल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. तसेच तो टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही, याबाबतही साशंकता आहे.