बाणावलीत इंडी आघाडीत फूट
काँग्रेसतर्फे रॉयला फर्नांडिस यांचा अर्ज दाखल : ‘आप’तर्फे जोसेफ पिमेंता यापूर्वीच रिंगणात
मडगाव : लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्ष एकत्र येत इंडी आघाडीची स्थापना केली होती. मात्र, लोकसभा निवडणूक संपल्यानंतर या आघाडीत सर्व काही ठिक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दक्षिण गोव्यात विजय मिळविल्यानंतर आता बाणावली मतदारसंघात होत असलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत या आघाडीत फूट पडली आहे. काँग्रेसच्या माजी राज्य सरचिटणीस तथा बाणावली मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या रॉयला फर्नांडिस यांनी काल बुधवारी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरून इंडी आघाडीच्या उमेदवारासमोर आव्हान उभे केले आहे.
बाणावली मतदारसंघात काँग्रेस पक्ष मजबूत असल्याने काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार उभा करावा, अशी मागणी रॉयला फर्नांडिस यांच्यासह इतरांनी केली होती. मात्र, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी काँग्रेस पक्ष इंडी आघाडीसोबत असल्याचे सांगून काँग्रेस कार्यकर्त्यांना दाद दिली नव्हती. काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. ग्रायफल उर्फ पोपू फर्नांडिस यांनीही अपक्ष म्हणून अर्ज भरला. पोपू फर्नांडिस यांना बाणावलीचे सरपंच झेवियर फर्नांडिस आणि गोवा फॉरवर्डचे कार्यकारी सदस्य पेले फर्नांडिस यांचा पाठिंबा आहे. मंगळवारी इंडी आघाडीच्या वतीने ‘आप’तर्फे जोसेफ पिमेंता यांनी अर्ज भरला आहे.
Home महत्वाची बातमी बाणावलीत इंडी आघाडीत फूट
बाणावलीत इंडी आघाडीत फूट
काँग्रेसतर्फे रॉयला फर्नांडिस यांचा अर्ज दाखल : ‘आप’तर्फे जोसेफ पिमेंता यापूर्वीच रिंगणात मडगाव : लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्ष एकत्र येत इंडी आघाडीची स्थापना केली होती. मात्र, लोकसभा निवडणूक संपल्यानंतर या आघाडीत सर्व काही ठिक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दक्षिण गोव्यात विजय मिळविल्यानंतर आता बाणावली मतदारसंघात होत असलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत या आघाडीत फूट पडली आहे. काँग्रेसच्या माजी राज्य […]